#Lockdown2.0 : अरे बापरे! तब्बल इतक्या लोकांची रोजी-रोटी येणार धोक्यात

पीटीआय
Thursday, 23 April 2020

कोरोनाच्या संसर्गामुळे जागतिक अर्थचक्र तर ठप्प झालेच आहे पण त्याचबरोबर याचा मोठा फटका विकसनशील देशांना बसत असल्याने जगातील भूकबळींची संख्या आणखी वाढेल. या वर्षाच्या अखेरपर्यंत जगातील एक चतुर्थांश लोकांच्या तोंडचा घास हिरावला जाणार असल्याचे ‘वर्ल्ड फूड प्रोग्रॅम’कडून (डब्लूएफपी) सांगण्यात आले.‘ ग्लोबल रिपोर्ट ऑन फूड क्रायसिस-२०२०’ या अहवालात जगातील भुकेच्या समस्येचा वेध घेण्यात आला आहे.

न्यूयॉर्क - कोरोनाच्या संसर्गामुळे जागतिक अर्थचक्र तर ठप्प झालेच आहे पण त्याचबरोबर याचा मोठा फटका विकसनशील देशांना बसत असल्याने जगातील भूकबळींची संख्या आणखी वाढेल. या वर्षाच्या अखेरपर्यंत जगातील एक चतुर्थांश लोकांच्या तोंडचा घास हिरावला जाणार असल्याचे ‘वर्ल्ड फूड प्रोग्रॅम’कडून (डब्लूएफपी) सांगण्यात आले.‘ ग्लोबल रिपोर्ट ऑन फूड क्रायसिस-२०२०’ या अहवालात जगातील भुकेच्या समस्येचा वेध घेण्यात आला आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

संघर्ष तीव्र
विषाणू संसर्गामुळे जागतिक व्यापार ठप्प झाला असून विविध देशांनी व्यापारांवर घातलेले निर्बंध हे सर्वांसाठी घातक ठरू शकतात. यामुळे काही देशांत साठेबाजी वाढेल तर काही देशांवर उपासमारीची वेळ येईल. सर्वांत कमी परकी चलनसाठा असणारा झिम्बाब्वे, आखाती देश, येमेन, इराक, लेबनॉन, आणि सीरियातील संघर्ष आणखी तीव्र होईल.

निधी लागणार
कोरोनाच्या संसर्गाचा सामना करण्यासाठी ‘डब्लूएफपी’ने वैश्‍विक मानवतावादी आराखडा तयार केला असून यासाठी साडेतीनशे दशलक्ष अमेरिकी डॉलरचा निधी संकलित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यंदा या संकटातून बाहेर पडण्यासाठी बारा अब्ज अमेरिकी डॉलर एवढा निधी लागेल. वैश्‍विक आपत्कालीन यंत्रणेला कार्यान्वित करण्यासाठी एवढा निधी गरजेचा आहे.

इतक्या लोकांची रोजी-रोटी धोक्यात
५५ देश
१३५ दशलक्ष लोक
२६५ दशलक्ष यांना संभाव्य धोका

संघर्षस्थळे
आफ्रिका
मध्यपूर्वेतील देश

येथील स्थिती जीवघेणी
उत्तर नायजेरिया
दक्षिण सुदान
सीरिया  येमेन


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: lockdown employment food danger global