धक्कादायक ! लॉकडाउनचे नियम मोडणाऱ्या १८ जणांचा एन्काउंटर; मानवाधिकार आयोगाचा अहवाल

वृत्तसंस्था
Friday, 17 April 2020

नायजेरियात लॉकडाउनच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या १८ जणांचा एन्काउंटर केला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मानवधिकार आयोगाने याबाबत एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्या अहवलात त्यांनी कोरोनामुळे नायजेरियात मृत्यू झालेल्यांपेक्षाही पोलिसांनी एन्काउंटर केलेल्यांची संख्या जास्त असल्याचे म्हटले आहे.

नायजेरिया : नायजेरियात लॉकडाउनच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या १८ जणांचा एन्काउंटर केला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मानवधिकार आयोगाने याबाबत एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्या अहवलात त्यांनी कोरोनामुळे नायजेरियात मृत्यू झालेल्यांपेक्षाही पोलिसांनी एन्काउंटर केलेल्यांची संख्या जास्त असल्याचे म्हटले आहे. असे वृत्त अलजजीरा या इंग्रजी संकेतस्थळानेही दिले आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनामुळे अनेक देशांमध्ये लॉकडाउन जाहीर करण्यात आला असून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात आहे. लॉकडाउनची यशस्वी अंमलबजावणी केली जावी यासाठी पोलिसही प्रयत्न करत आहेत. परंतु, नायजेरीयातील हे अहवाल धक्कादायक आहेत. मानवाधिकार आयोगाने आपल्याकडे लोकांनी फोन करुन तसंच व्हिडीओ पाठवून या हत्यांची माहिती दिली असल्याचं सांगितलं आहे. त्यानुसार, ३० मार्चपासून लॉकडाउन सुरु झाल्यापासून पोलिसांनी १८ जणांची हत्या केली आहे. तर आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनामुळे देशात १२ जणांचा मृत्यू झाला असल्याचे म्हटले आहे.

आरबीआयकडून ५०हजार कोटींचे पॅकेज जाहीर; लघु आणि मध्य उद्योगांना दिलासा

नायजेरियात कोरोनाचे एकूण ४०७ रुग्ण आढळले असून व्हायरस अजून वेगाने पसरण्याची भीती आहे. नायजेरियन पोलिसांची प्रतिमा क्रूर अशीच आहे. मानवाधिकार आयोगाने आपल्या अहवालात दिलेल्या माहितीनुसार, आठ वेगवेगळ्या घटनांमध्ये १८ जणांची हत्या करण्यात आल्याचं समोर आलं आहे. आयोगाने आपल्याला ३६ पैकी ४२ राज्यांमधून जवळपास १०० तक्रारी आल्या असल्याचं सांगितलं आहे. मानवाधिकार आयोगाच्या अहवालावर अद्याप सुरक्षा दलाकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nigerian security forces kill 18 during curfew enforcement