esakal | व्होडका प्या, ट्रॅक्टर चालवा, बकरीसोबत खेळा अन् कोरोनाला पळवा : 'या' देशाच्या राष्ट्रपतींचा सल्ला
sakal

बोलून बातमी शोधा

Nobody will die from coronavirus in Belarus, says president

कोरोनाला हरवण्यासाठी बेलारूसच्या राष्ट्रपतींनी अजब सल्ला दिला आहे. बेलारूसचे राष्ट्रपती अलेक्झांडर लुकाशेन्को यांच्या मते, कोरोनाला हरवण्यासाठी लस नसेल तर, त्यावर उपाय आहे तो म्हणजे व्होडका पिणे.

व्होडका प्या, ट्रॅक्टर चालवा, बकरीसोबत खेळा अन् कोरोनाला पळवा : 'या' देशाच्या राष्ट्रपतींचा सल्ला

sakal_logo
By
वृत्तसंस्था

मिन्‍स्‍क : कोरोनाचा प्रादुर्भाव जगभर होत असताना कोरोनाला हरवण्यासाठी बेलारूसच्या राष्ट्रपतींनी अजब सल्ला दिला आहे. बेलारूसचे राष्ट्रपती अलेक्झांडर लुकाशेन्को यांच्या मते, कोरोनाला हरवण्यासाठी लस नसेल तर, त्यावर उपाय आहे तो म्हणजे व्होडका पिणे. त्यासोबतच ट्रॅक्टर चालवणे आणि बकरीसोबत खेळणे हे पर्यायसुद्धा उपायकारक ठरू शकतात असे त्यांनी म्हटले आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अलेक्झांडर लुकाशेन्को यांच्या मते, व्होडका प्यायल्यामुळे शरिरात उष्णता वाढेल. दुसरीकडे बेलारूसमध्ये अधिकृतपणे कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या २५ झाली आहे. इतकेच नाही तर कोरोना विषाणूवर अलेक्झांडरने असे म्हटले आहे की, मद्यपान करणे, ट्रॅक्टर चालवणे, बकरीसोबत खेळण्यानेही हा आजार बरा होईल.

Coronavirus : यापेक्षा मोठी देशभक्ती नाही; सोनिया गांधीचा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर

अलेक्झांडर यांना ब्रिटीश माध्यमांत हुकूमशहा म्हटले जाते. अलेक्झांडरवर असेही आरोप आहेत की ते डॉक्टर आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करीत आहेत आणि कोरोनाला गांभीर्याने घेत नाही आहे. यामुळे बर्‍याच लोकांचा मृत्यू झाला आहे. एवढेच नाही तर राष्ट्रपती अलेक्झांडर यांनी लॉकडाऊन करण्यास नकार दिला आहे. बेलारुसमध्ये एकूण 95 लाख लोक आहेत.

Coronavirus : सुंदर पिचाईंची भारताला ०५ कोटींची मदत 

अलेक्झांडर यांनी आम्ही कोरोनाला रोखण्यासाठी औषधे आम्ही शोधली आहेत. त्यामुळे आपल्या देशात लॉकडाऊनची गरज नाही' असे तेथिल लोकांना सांगितले होते. 65 वर्षीय अलेक्झांडर 25 वर्षाहून अधिक काळ देशात सत्तेत आहे. कोरोना रोग बरा करण्यासाठी कोणत्या औषधाविषयी ते बोलत आहेत हे त्यांनी सविस्तरपणे सांगितले नाही. तसेच, ते अजूनही देशात कोरोनामुळे एकही मृत्यू झाला नसल्याचे सांगत आहेत.

loading image
go to top