esakal | अमेरिका झाली, आता रशिया, पाकिस्तानमधील परिस्थिती बिघडली
sakal

बोलून बातमी शोधा

Coronacirus

अमेरिका आणि अन्य बड्या युरोपियन देशांतील कोरोना विषाणूचा उद्रेक आता नियंत्रणात आला असतानाच रशिया आणि पाकिस्तानमधील स्थिती आणखी बिकट होऊ लागली आहे. अनेक युरोपियन देशांनी त्यांच्या अर्थचक्राला गती देण्यासाठी उद्योग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

अमेरिका झाली, आता रशिया, पाकिस्तानमधील परिस्थिती बिघडली

sakal_logo
By
पीटीआय

न्यूयॉर्क - अमेरिका आणि अन्य बड्या युरोपियन देशांतील कोरोना विषाणूचा उद्रेक आता नियंत्रणात आला असतानाच रशिया आणि पाकिस्तानमधील स्थिती आणखी बिकट होऊ लागली आहे. अनेक युरोपियन देशांनी त्यांच्या अर्थचक्राला गती देण्यासाठी उद्योग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोनाच्या जगभरातील घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पाकला फटका 
पाकिस्तानमध्ये आणखी  १ हजार २९७  लोकांना कोरोनाची बाधा झाली असून येथील एकूण बाधितांचा आकडा लवकरच २० हजारांवर जाऊ शकतो. पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी देशांतील चाचण्या आणखी वाढविण्याचा निर्णय घेतला असून यामुळे बाधितांची संख्या आणखी वाढू शकते.

आणखी वाचा - चीनची राजधानी बीजिंगचं चित्र बदलतंय वाचा सविस्तर बातमी 

मॉस्कोला तडाखा
रशियात आज ७  हजार  ९३३ जणांना संसर्ग झाला असून  एकूण बाधितांची संख्या १ लाख १४ हजार ४३१ वर पोचली आहे. ही आकडेवारी आणखी असण्याची भीती आहे. रशियातील पाच राज्यांना याचा मोठा फटका बसला असून मॉस्कोमध्ये हा संसर्ग उच्चांकी पातळीवर गेला आहे. रशियाचे पंतप्रधान मिखाईल मिशुस्टीन यांना देखील कोरोनाची बाधा झाली असून त्यांना मंत्रीमंडळाच्या बैठका घेणे थांबविले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेनं अमेरिकेशी 'पंगा'; चीनचं तोंडभरून कौतुक

चीनला दिलासा 
चीनमधील संसर्ग घटला असून  बीजिंगमध्ये व्यवहार पूर्ववत सुरू  झाले  आहेत.  उत्तर आणि दक्षिण कोरिया सामूहिक संसर्गापासून बचावले असून  येथील आर्थिक चक्रे गतिमान होणार आहेत.  फ्रान्स, जर्मनी, स्पेनमधील कारखाने कार्यालये पुन्हा सुरू होणार असून येथील संसर्ग कमी झाला आहे. 

न्यूयॉर्कमधील शाळा बंद 
अमेरिकेत टेक्सास, दक्षिण कॅरोलिना राज्यांतील हॉटेल दुकाने, उद्योग सुरू  होणार  असून न्यूयॉर्कचे गव्हर्नर अँड्रयू क्यूओमो यांनी मात्र  राज्यातील शाळा आणि महाविद्यालये पुढील वर्षभरासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.  न्यूयॉर्क हे शहर कोरोनाच्या उद्रेकाचा केंद्रबिंदू असून येथील तीन लाखांपेक्षाही अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला असून २३ हजारांपेक्षा अधिक लोक मरण पावले आहेत.

जगभरातील कोरोनाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अमेरिकेत ‘एचसीक्यू’चा प्राधान्याने वापर
वॉशिंग्टन - कोरोना रुग्णांवर उपचार करताना अमेरिकेतील रुग्णालयांमध्ये हायड्रॉक्सिक्लोरोक्विन (एचसीक्यू) या औषधाचा प्राधान्याने वापर होत असल्याचे ‘एमदेज’ या संस्थेच्या अहवालानुसार समजते. अनेक रुग्णालयांमध्ये प्राधान्याने ‘एचसीक्यू’ आणि नंतर टोसिलायझुमाब या औषधाचा वापर होत आहे. ‘एचसीक्यू’ हे अनेक वर्षांपासून मलेरियाविरुद्ध वापरले जाते. अमेरिकेने भारताकडून हे औषध मोठ्या प्रमाणावर आयात केले आहे. 

जगभरातील कोरोनाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

चीनमध्ये एकच नवा रुग्ण
बीजिंग - चीनमध्ये आज दिवसभरात फक्त एकच नवा रुग्ण आढळून आला. चीनमध्ये एकूण ८२,८७५ कोरोनाग्रस्त असून आतापर्यंत ७७,६८५ जणांना उपचारांनंतर घरी सोडण्यात आले आहे. कोरोनाच्या उद्रेकाचे केंद्र असलेल्या वुहान शहरात आणि हे शहर राजधानी असलेल्या हुबेई प्रांतात सलग २८ दिवसांत एकही रुग्ण आढळलेला नाही. 

व्हेनेझुएलामध्ये तुरुंगात दंगल
कॅराकास : घरचे जेवण मिळावे म्हणून गोनार शहरातील तुरुंगात झालेल्या दंगलीत चाळीस जणांचा मृत्यू झाला असून पन्नासहून अधिक जण जखमी झाले आहेत. कैद्यांनी बेकायदा बाळगलेल्या हत्यारांच्या साह्याने सुरक्षा रक्षकांवर हल्ला केला. मृतांपैकी कैदी आणि रक्षकांची संख्या अद्याप समजलेली नाही. 

loading image
go to top