Coronavirus : जगभरात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या पोहोचली 24 लाखांवर

वृत्तसंस्था
Tuesday, 21 April 2020

जगभरात 24,82,550  कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद

- अमेरिकेत सर्वाधिक रुग्ण

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. या व्हायरसने अनेक देशांना आपल्या विळख्यात ओढलं आहे. असे असताना अमेरिका, इटली, फ्रान्ससह भारतातही कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या जगभरात 24,82,550 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर यातील विशेष बाब म्हणजे 6,52,479 रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. इटली, अमेरिकेसह भारतात कोरोनाच्या रुग्णांची संख्या मोठी आहे. त्यामुळे सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर विविध सरकारे उपाययोजना करत आहेत. 'वर्ल्ड मीटर्स' या वेबसाईटनुसार, जगभरात आत्तापर्यंत दीड लाखांहून अधिक कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर सहा लाखपेक्षा अधिक रुग्णांवर उपचार करून घरी सोडण्यात आले आहे.

Coronavirus

जगभरात 24,82,550  कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. जगभरात 24,82,550 कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये जवळपास 1,70,479 जणांचा मृत्यू झाला आहे. 6,52,479 रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले.

अमेरिकेत सर्वाधिक रुग्ण

अमेरिकेत कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. सध्या अमेरिकेत 7,92,938 नागरिकांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. तर यामध्ये 42,518 रुग्णांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याने मृत्यू झाला आहे.

Coronavirus

इटलीत वाढतीये मृतांची संख्या

कोरोनाग्रस्त रुग्णांच्या मृतांचे प्रमाण इटलीमध्ये वाढत आहे. इटलीमध्ये सध्या एकूण 1,81,228 नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र, तेथील मृतांचा आकडा हा 24,114 वर गेला आहे. हे प्रमाण इतर देशांच्या तुलनेत अधिक आहे. तसेच आत्तापर्यंत 48,877 रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Number of Coronavirus Infected Peoples rising in World now 2482550 Patient