Coronavirus : आता अमेरिकेला कोरोनाचा विळखा; रुग्णांची संख्या तर...

वृत्तसंस्था
शुक्रवार, 27 मार्च 2020

जगभरात 5,32,237 कोरोनाबाधित 

अमेरिकेत सर्वाधिक रुग्ण

वॉशिंग्टन : जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. चीनमधून सुरुवात झालेला कोरोना व्हायरस युरोप, अमेरिका आणि आता जगभरात धुमाकूळ घालत आहे. यापूर्वी चीनमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या सर्वाधिक होती. मात्र, आता अमेरिकेत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या सर्वाधिक असल्याची माहिती समोर आली आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

संपूर्ण जगात कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत आहे. यापूर्वी चीनमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक होते. त्यानंतर इटलीमध्ये याचा फैलाव मोठ्या प्रमाणात दिसून आला होता. मात्र, आता या दोन्ही देशानंतर अमेरिकेत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या सर्वाधिक झाली आहे. इतर देशांच्या तुलनेत अमेरिकेत सर्वाधिक 85,435 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत. 

जगभरात 5,32,237 कोरोनाबाधित 

संपूर्ण जगाला कोरोना विळखा घातला आहे. जगभरात आत्तापर्यंत 5,32,237 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 24,089 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच जगभरात 1,24,326 रुग्ण कोरोनावरील उपचार करुन बरे झाले आहेत. 

Coronavirus: कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी ...

अमेरिकेत सर्वाधिक रुग्ण

अमेरिकेत सध्या 85,594 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. ही संख्या चीन, इटलीच्या तुलनेत सर्वाधिक आहे. तसेच यातील मृतांची संख्या 1,300 वर गेली आहे. तर 1,868 रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले असून, ते बरेही झाले आहेत. तर 2,122 रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याचे समोर आले आहे. 

सर्वाधिक मृत्यू इटलीमध्ये

अमेरिकेत कोरोनाबाधितांची संख्या जगात सर्वाधिक असली तरीदेखील मृतांची संख्या इटलीमध्येच मोठ्या प्रमाणात आहे. सध्या इटलीमध्ये 8,215 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. तर कोरोनाबाधितांची संख्या 80,589 झाली आहे. 

घाबरू नका! देशात मृतांचा आकडा वाढणार ...

चीनमध्ये कोरोनाबाधितांची संख्या कमी

चीनपासून सुरुवात झालेल्या या कोरोनाच्या रुग्णांची संख्या इतर देशांच्या तुलनेत कमी आहे. या देशात 81,340 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. तर चीनमध्ये 3,292 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Number of Coronavirus Patient Increases in America