Coronavirus : जगभरात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतीये; आता...

वृत्तसंस्था
गुरुवार, 26 मार्च 2020

सर्वाधिक रुग्ण चीनमध्ये

- इटलीत मृतांचे प्रमाण सर्वाधिक

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. या व्हायरसने अनेक देशांना आपल्या विळख्यात ओढलं आहे. असे असताना चीन, इटलीसह भारतातही कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या जगभरात 4,71,060 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर यातील विशेष बाब म्हणजे 1,14,218 रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. इटली, अमेरिकेसह भारतात कोरोनाच्या रुग्णांची संख्या मोठी आहे. भारतात आत्तापर्यंत 657 नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच महाराष्ट्रातही कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला आहे. त्यामुळे सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर विविध सरकारे उपाययोजना करत आहेत. 

जगभरात 4,71,060  कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद 

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. जगभरात 4,71,060 कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये जवळपास 21,283 जणांचा मृत्यू झाला आहे. 1,14,218 रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले.

coronavirus esakal

सर्वाधिक रुग्ण चीनमध्ये

चीनमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. चीनमध्ये आत्तापर्यंत 81,285 नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 3,287 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच यातील विशेष बाब म्हणजे 74,051 रुग्ण पूर्ण बरे झाले आहेत. 

इटलीत मृतांचे प्रमाण सर्वाधिक

कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ही चीनच्या तुलनेत इटलीमध्ये कमी आहे. सध्या इटलीमध्ये एकूण 74,386 नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र, तेथील मृतांचा आकडा हा 7,503 वर गेला आहे. हे प्रमाण इतर देशांच्या तुलनेत अधिक आहे. तसेच आत्तापर्यंत 9,362 रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहे.   


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Number of Coronavirus Patient Increases in The World