Coronavirus : कोरोनाचे थैमान सुरुच; रुग्णांची संख्या १२ लाखांवर

वृत्तसंस्था
Sunday, 5 April 2020

जगभरात 12,01,964 कोरोनाबाधित 

सर्वाधिक मृत्यू इटलीमध्ये

नवी दिल्ली : जगभरात कोरोना व्हायरसचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आता अमेरिका, युरोप, स्पेन, भारत, इटली, चीनसह इतर अनेक देशांत कोरोना व्हायरस धुमाकूळ घालत आहे. यापूर्वी चीनमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या सर्वाधिक होती. मात्र, आता अमेरिकेत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या सर्वाधिक असल्याची माहिती समोर आली आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

संपूर्ण जगात कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत आहे. यापूर्वी चीनमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक होते. त्यानंतर इटलीमध्ये याचा फैलाव मोठ्या प्रमाणात दिसून आला होता. मात्र, आता या दोन्ही देशानंतर अमेरिकेत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या सर्वाधिक झाली आहे. इतर देशांच्या तुलनेत अमेरिकेत सर्वाधिक 3,11,357 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत. 

घाबरू नका! देशात मृतांचा आकडा वाढणार ...

जगभरात 12,01,964 कोरोनाबाधित 

संपूर्ण जगाला कोरोनाने विळखा घातला आहे. जगभरात आत्तापर्यंत 12,01,964 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 64,727 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच जगभरात 2,46,638 रुग्णांना कोरोनावरील उपचार करुन घरी सोडण्यात आले आहे.  

अमेरिकेत कोरोनाबाधितांचा तीन लाखांवर

अमेरिकेत सध्या 3,11,357 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. ही संख्या चीन, इटलीच्या तुलनेत सर्वाधिक आहे. तसेच यातील मृतांची संख्या 8,452 वर गेली आहे. तर 8,206  रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याचे समोर आले आहे. यातील विशेष बाब म्हणजे 14,825 रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले असून, ते बरेही झाले आहेत. 

Latest Western (Paschim) Maharashtra News Update, Breaking ...

सर्वाधिक मृत्यू इटलीमध्ये

अमेरिकेत कोरोनाबाधितांची संख्या जगात सर्वाधिक असली तरीदेखील मृतांची संख्या ही इटलीमध्येच मोठ्या प्रमाणात आहे. सध्या इटलीमध्ये 15,362 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. तर इटलीमध्ये कोरोनाबाधितांची संख्या 1,24,632 झाली आहे. 

चीनमध्ये कोरोनाबाधितांची संख्या कमी

चीनपासून सुरुवात झालेल्या या कोरोनाच्या रुग्णांची संख्या इतर देशांच्या तुलनेत कमी आहे. या देशात 81,669 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. तर चीनमध्ये 3,329 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

India gearing up to tackle probable coronavirus attack in the country

तरुणांची संख्या जास्त

कोरोनाग्रस्त रुग्णांची माहितीही सध्या समोर येत आहे. यामध्ये २१ ते ४० वर्षे वयोगटातील नागरिकांना झपाट्याने लागण होत आहे. याच वयोगटातील सर्वाधिक ४२ टक्के रूग्ण असल्याची आकडेवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Number of Coronavirus Patient Increases in The World