Coronavirus : कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ; मृतांची संख्या...

वृत्तसंस्था
Wednesday, 8 April 2020

अमेरिकेत कोरोनाबाधितांचा आकडा चार लाखांवर

- सर्वाधिक मृत्यू इटलीमध्ये

- चीनमध्ये कोरोनाबाधितांची संख्या कमी

नवी दिल्ली : जगभरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आता अमेरिका, स्पेन, भारत, इटली, चीनसह इतर अनेक देशांत कोरोना व्हायरस धुमाकूळ घालत आहे. यापूर्वी चीनमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या सर्वाधिक होती. मात्र, आता अमेरिकेत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या सर्वाधिक असल्याची माहिती समोर आली आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

संपूर्ण जगात कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत आहे. यापूर्वी चीनमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक होते. त्यानंतर इटलीमध्ये याचा फैलाव मोठ्या प्रमाणात दिसून आला होता. मात्र, आता या दोन्ही देशानंतर अमेरिकेत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या सर्वाधिक झाली आहे. इतर देशांच्या तुलनेत अमेरिकेत सर्वाधिक 4,00,412 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत. 

जगभरात 14,31,691 कोरोनाबाधित 

संपूर्ण जगाला कोरोनाने विळखा घातला आहे. जगभरात आत्तापर्यंत 14,31,691 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 82,078 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच जगभरात 3,02,150 रुग्णांना कोरोनावरील उपचार करुन घरी सोडण्यात आले आहे.  

Latest Western

अमेरिकेत कोरोनाबाधितांचा आकडा चार लाखांवर

अमेरिकेत सध्या 4,00,412 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. ही संख्या चीन, इटलीच्या तुलनेत सर्वाधिक आहे. तसेच यातील मृतांची संख्या 12,854 वर गेली आहे. तर 9,169 रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याचे समोर आले आहे. यातील विशेष बाब म्हणजे 21,674 रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले असून, ते बरेही झाले आहेत. 

सर्वाधिक मृत्यू इटलीमध्ये

अमेरिकेत कोरोनाबाधितांची संख्या जगात सर्वाधिक असली तरीदेखील मृतांची संख्या ही इटलीमध्येच मोठ्या प्रमाणात आहे. सध्या इटलीमध्ये 17,127 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. तर इटलीमध्ये कोरोनाबाधितांची संख्या 1,35,586 झाली आहे. 

चीनमध्ये कोरोनाबाधितांची संख्या कमी

चीनपासून सुरुवात झालेल्या या कोरोनाच्या रुग्णांची संख्या इतर देशांच्या तुलनेत कमी आहे. या देशात 81,802 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. तर चीनमध्ये 3,333 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

स्पेनमध्ये वाढले कोरोनाग्रस्त रुग्ण 

कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या अनेक देशामध्ये वाढत आहे. सध्या स्पेनमध्ये 1,41,942 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर आत्तापर्यंत 14,045 रुग्णांचा कोरोनाची लागण झाल्याने मृत्यू झाला आहे. तर 43,208 जणांवर उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. 

India

फ्रान्समध्ये कोरोनाग्रस्त मृतांचा आकडा दहा हजार पार 

फ्रान्समध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. सध्या 1,09,069 जणांना कोरोनाची लागण झाली तर यामध्ये 10,328 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 19,337 कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यात आले असून, त्यांना घरी सोडण्यात आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Number of Coronavirus Patient Increases in The World