Coronavirus : जगभरात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ; मृतांचा आकडा...

वृत्तसंस्था
Sunday, 12 April 2020

अमेरिकेत कोरोनाबाधितांचा आकडा पाच लाखांवर

- चीनमध्ये कोरोनाबाधितांची संख्या कमी

नवी दिल्ली : जगभरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आता अमेरिका, स्पेन, भारत, इटली, चीनसह इतर अनेक देशांत कोरोना व्हायरस धुमाकूळ घालत आहे. यापूर्वी चीनमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या सर्वाधिक होती. मात्र, आता अमेरिकेत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या सर्वाधिक असल्याची माहिती समोर आली आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

संपूर्ण जगात कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत आहे. यापूर्वी चीनमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक होते. त्यानंतर इटलीमध्ये याचा फैलाव मोठ्या प्रमाणात दिसून आला होता. मात्र, आता 'वर्ल्ड मीटर' या संकेतस्थळानुसार, या दोन्ही देशानंतर अमेरिकेत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या सर्वाधिक झाली आहे. इतर देशांच्या तुलनेत अमेरिकेत सर्वाधिक 5,32,879 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत. 

जगभरात 17,80,315 कोरोनाबाधित 

संपूर्ण जगाला कोरोनाने विळखा घातला आहे. जगभरात आत्तापर्यंत 17,80,315 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 1,08,828 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच जगभरात 4,04,031 रुग्णांना कोरोनावरील उपचार करुन घरी सोडण्यात आले आहे.  

Coronavirus

अमेरिकेत कोरोनाबाधितांचा आकडा पाच लाखांवर

अमेरिकेत सध्या 5,32,879 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. ही संख्या चीन, इटलीच्या तुलनेत सर्वाधिक आहे. तसेच यातील मृतांची संख्या 20,577 वर गेली आहे. तर 11,471 रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याचे समोर आले आहे. यातील विशेष बाब म्हणजे 30,453 रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले असून, ते बरेही झाले आहेत. 

चीनमध्ये कोरोनाबाधितांची संख्या कमी

चीनपासून सुरुवात झालेल्या या कोरोनाच्या रुग्णांची संख्या इतर देशांच्या तुलनेत कमी आहे. या देशात 82,052 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. तर चीनमध्ये 3,339 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

Coronavirus

स्पेनमध्ये वाढले कोरोनाग्रस्त रुग्ण 

कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या अनेक देशामध्ये वाढत आहे. सध्या स्पेनमध्ये 1,63,027 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर आत्तापर्यंत 16,606 रुग्णांचा कोरोनाची लागण झाल्याने मृत्यू झाला आहे. तर 59,109 जणांवर उपचार करून घरी सोडण्यात आले आहे.

Coronavirus

फ्रान्समध्ये कोरोनाग्रस्त मृतांचा आकडा 13 हजार पार 

फ्रान्समध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. सध्या 1,29,654 जणांना कोरोनाची लागण झाली तर यामध्ये 13,832 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 26,391 कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यात आले असून, त्यांना घरी सोडण्यात आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Number of Coronavirus Patient Increases in The World