esakal | Coronavirus : अमेरिकेनंतर 'या' देशात कोरोनाग्रस्तांची संख्या सर्वाधिक
sakal

बोलून बातमी शोधा

Coronavirus : अमेरिकेनंतर 'या' देशात कोरोनाग्रस्तांची संख्या सर्वाधिक

अमेरिकेत कोरोनाबाधितांचा तीन लाखांवर

- स्पेनमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्याही वाढतीये

Coronavirus : अमेरिकेनंतर 'या' देशात कोरोनाग्रस्तांची संख्या सर्वाधिक

sakal_logo
By
वृत्तसंस्था

माद्रिद : जगभरात कोरोना व्हायरसचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. इटली, चीनमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या सर्वाधिक होती. या देशांना मागे टाकत आता अमेरिकेनंतर स्पेनमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. या सर्व देशांत कोरोना व्हायरस धुमाकूळ घालत आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

संपूर्ण जगात कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत आहे. यापूर्वी चीनमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक होते. त्यानंतर इटलीमध्ये याचा फैलाव मोठ्या प्रमाणात दिसून आला होता. मात्र, आता या दोन्ही देशानंतर अमेरिकेत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या सर्वाधिक झाली आहे. इतर देशांच्या तुलनेत अमेरिकेत सर्वाधिक 3,11,357 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत. पण आता अमेरिकेनंतर स्पेनमध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.

जगभरात 12,01,964 कोरोनाबाधित 

संपूर्ण जगाला कोरोनाने विळखा घातला आहे. जगभरात आत्तापर्यंत 12,01,964 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 64,727 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच जगभरात 2,46,638 रुग्णांना कोरोनावरील उपचार करुन घरी सोडण्यात आले आहे.  

अमेरिकेत कोरोनाबाधितांचा तीन लाखांवर

अमेरिकेत सध्या 3,11,357 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. ही संख्या चीन, इटलीच्या तुलनेत सर्वाधिक आहे. तसेच यातील मृतांची संख्या 8,452 वर गेली आहे. तर 8,206  रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याचे समोर आले आहे. यातील विशेष बाब म्हणजे 14,825 रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले असून, ते बरेही झाले आहेत. 

स्पेनमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्याही वाढतीये

अमेरिकेत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या अधिक आहे. या देशानंतर स्पेनमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ झाली. सध्या 1,26,168 नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर आत्तापर्यंत 11,947 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तसेच 34,219 रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले असून, त्यांना रुग्णालयातून सोडून देण्यात आले आहे.  

loading image