Coronavirus : अमेरिकेत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या चार लाख पार; मृतांची संख्या...

वृत्तसंस्था
Thursday, 9 April 2020

अमेरिकेत कोरोनाबाधितांचा आकडा चार लाख पार

- जगभरात 15 लाख कोरोनाबाधित 

वॉशिंग्टन : जगभरात कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आता अमेरिका, स्पेन, भारत, इटली, चीनसह इतर अनेक देशांत कोरोना व्हायरस धुमाकूळ घालत आहे. यापूर्वी चीनमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या सर्वाधिक होती. मात्र, आता अमेरिकेत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या सर्वाधिक असल्याची माहिती समोर आली आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

संपूर्ण जगात कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत आहे. यापूर्वी चीनमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक होते. त्यानंतर इटलीमध्ये याचा फैलाव मोठ्या प्रमाणात दिसून आला होता. मात्र, आता या दोन्ही देशानंतर अमेरिकेत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या सर्वाधिक झाली आहे. इतर देशांच्या तुलनेत अमेरिकेत सर्वाधिक 4,35,160 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत. 

जगभरात 15 लाख कोरोनाबाधित 

संपूर्ण जगाला कोरोनाने विळखा घातला आहे. जगभरात आत्तापर्यंत 15,19,012 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 88,518 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच जगभरात 3,30,697 रुग्णांवर कोरोनावरील उपचार करुन घरी सोडण्यात आले आहे.  

Coronavirus : राज्यातील रुग्णांची संख्या ...

अमेरिकेत कोरोनाबाधितांचा आकडा चार लाख पार

अमेरिकेत सध्या 4,35,160 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. ही संख्या चीन, इटलीच्या तुलनेत सर्वाधिक आहे. तसेच यातील मृतांची संख्या 14,797 वर गेली आहे. तर 9,279 रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याचे समोर आले आहे. यातील विशेष बाब म्हणजे 22,891 रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले असून, ते बरेही झाले आहेत. 

सर्वाधिक मृत्यू इटलीमध्ये

अमेरिकेत कोरोनाबाधितांची संख्या जगात सर्वाधिक असली तरीदेखील मृतांची संख्या ही इटलीमध्येच मोठ्या प्रमाणात आहे. सध्या इटलीमध्ये 17,669 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. तर इटलीमध्ये कोरोनाबाधितांची संख्या 1,39,422 झाली आहे. 

Coronavirus : पुणे विभागात कोरोना बाधित ...

स्पेनमध्ये वाढले कोरोनाग्रस्त रुग्ण 

कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या अनेक देशामध्ये वाढत आहे. सध्या स्पेनमध्ये 1,48,220 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर आत्तापर्यंत 14,792 रुग्णांचा कोरोनाची लागण झाल्याने मृत्यू झाला आहे. तर 48,021 जणांवर उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Number of Coronavirus Patient Increasing in USA