esakal | Coronavirus : आम्हाला मदत करा, पाकिस्तानची भारताकडे औषधांची मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

Pakistan seeks Hydroxychloroquine from India to curb the Coronavirus pandemic

कोरोनाचा प्रादुर्थाव संपूर्ण जगात होत असताना यातून आपले शेजारी राष्ट्र पाकिस्तानही सुटू शकलेले नाही. पाकिस्तानमध्येही कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनासोबत लढण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आता भारत सरकारकडे मदत मागितली आहे. पाकिस्तानने भारताकडे हायड्रॉक्सीक्लोरोक्विनचा पुरवठा करण्यची मागणी केली आहे.

Coronavirus : आम्हाला मदत करा, पाकिस्तानची भारताकडे औषधांची मागणी

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : कोरोनाचा प्रादुर्थाव संपूर्ण जगात होत असताना यातून आपले शेजारी राष्ट्र पाकिस्तानही सुटू शकलेले नाही. पाकिस्तानमध्येही कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनासोबत लढण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आता भारत सरकारकडे मदत मागितली आहे. पाकिस्तानने भारताकडे हायड्रॉक्सीक्लोरोक्विनचा पुरवठा करण्यची मागणी केली आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अमेरिका आणि ब्राझीलने भारताकडे हायड्रॉक्सीक्लोरोक्विनचा पुरवठा करण्याची मागणी याआधी केली होती. हायड्रॉक्सीक्लोरोक्विन हे औषध कोरोना व्हायरसवर प्रभावी ठरु शकतं असा अंदाज असल्याने सर्वच देशांमध्ये सध्या या औषधाला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. भारताकडे हायड्रॉक्सीक्लोरोक्विनसाठी मदत मागणाऱ्या देशांमध्ये आता पाकिस्तानचाही समावेश झाला आहे. पाकिस्तानमध्ये कोरोनाचे सहा हजार रुग्ण सापडले असून १०० जणांचा मृत्यू झाला आहे.

याआधी इम्रान खान यांनी पाकिस्तानला मदतीचं आवाहन करणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यामध्ये ते म्हणाले होते की, आंतरराष्ट्रीय समुदाय, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद आणि आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था यांना माझं आवाहन आहे की, या संकटाच्या काळात पाकिस्तानसारख्या कर्जबाजारी देशांसाठी काही तरी ठोस मोहीम राबवावी. या मोहिमेअंतर्गत विकसनशील देशांचे कर्ज माफ करण्यात यावं.

loading image