Coronavirus : इथं सुरु आहे क्वारंटाईन पण...

वृत्तसंस्था
Saturday, 4 April 2020

- देशातील नागरिकांसाठी हा नियम लागू

- महिला-पुरुष पद्धतीने क्वारंटाईन

- असा आहे नियम...

लिमा : कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. या व्हायरचा प्रादुर्भाव रोखता यावा, यासाठी अमेरिका, चीन, इटली, भारतासह सगळ्याच देशांकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनची घोषणा केली. मात्र, पेरूमध्ये सरकारने एक विशेष योजनाच आणली आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनाला आळा घालण्यासाठी सर्वच प्रयत्न सुरु आहेत. त्याच पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन करण्यात आले. तर दुसरीकडे पेरु देशात यावर लगाम लावण्यासाठी एक वेगळाच निर्णय घेण्यात आला आहे. राजधानी दिल्लीत प्रदूषणाचे प्रमाण मोठे होते. त्यामुळे त्या राज्यात वाहनांच्या क्रमांकावरून रस्त्यावर वाहने आणण्यासाठी नियमावली आणली गेली. त्यानुसार ऑड-इव्हन फॉर्म्युला सुरु केला गेला. मात्र, अशाच प्रकारचे नियम लागू करण्याची घोषणा पेरू या देशाकडून करण्यात आली. पेरूचे राष्ट्रपती मार्टीन विजकारा यांनी ही घोषणा केली आहे

देशातील नागरिकांसाठी हा नियम लागू

दिल्लीत फक्त वाहनांसाठी ऑड-इव्हन नियम लागू करण्यात आला होता. मात्र, आता पेरूमध्ये हा नियम वाहनांसाठी नाही तर नागरिकांसाठी सुरु केला गेला आहे. हा नियम १२ एप्रिलपर्यंत लागू राहणार आहे. 

महिला-पुरुष पद्धतीने क्वारंटाईन

पेरूमध्ये कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी लिंग आधारित क्वॉरन्टाईनची घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार एका दिवशी फक्त महिला घराबाहेर पडू शकणार आहेत. तर दुसऱ्या दिवशी फक्त पुरुषांना घराबाहेर निघता येणार आहे. हा नियम शुक्रवारपासून लागू करण्यात आला आहे. 

Coronavirus: UAE travellers to get quarantine stamp on arrival in ...

असा आहे नियम...

पेरूमध्ये लागू केलेल्या नियमानुसार सोमवार, बुधवार आणि शुक्रवार फक्त पुरुषांना घराबाहेर जाता येईल. तर मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी फक्त महिलांना बाहेर जाता येणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: peru implement odd and even for women and men for stopping corona infection