स्वित्झर्लंड सरकारची या दोन वर्गांसाठी खुषखबर; काय ते वाचा?

पीटीआय
Thursday, 30 April 2020

स्काइप कॉल्सवर समाधान
बहुतेक आजी-आजोबा नातवंडांना पाहण्यासाठी जगतात. त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हे महत्त्वाचे असते. बुजुर्गांना संसर्गाचा धोका मुलांमुळे नव्हे तर त्यांच्या पालकांमुळे (म्हणजे त्यांच्या मुलांमुळे) असतो. कोरोनामुळे मात्र स्काईप कॉल्सवर समाधान मानणे आणि नातवंडांशी त्याच माध्यमातून संवाद साधणे बुजुर्गांना भाग पडले होते.
 

झुरीच - कोरोनाचा सर्वाधिक धोका बुजुर्गांना असल्यामुळे युरोपात बहुतांश ठिकाणी आजी-आजोबांची नातवंडांपासून ताटातूट झाली आहे. या पार्श्वभूमीवर स्वित्झर्लंडमध्ये या दोन वर्गांसाठी सरकारने खुषखबर दिली. आता नातवंड आजी-आजोबांना मिठी मारू शकतात असे सरकारी अधिकाऱ्यांनी अधिकृतपणे सांगितले. कोरोनाबाबत लागू करण्यात आलेल्या अधिकृत मार्गदर्शक सूचनांचा आढावा घेण्यात आला आणि नव्या सूचना जारी करण्यात आल्या. त्याआधी झुरीच, बर्न आणि जिनीव्हा या विद्यापीठांतील तज्ञांशी सल्लामसलत करण्यात आली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जर्मनीच्या मते निष्कर्ष नाही
आजी-आजोबा आणि नातवंड यांच्यातील भेटीसंदर्भात जर्मनी आणि ब्रिटन या देशांतील अधिकाऱ्यांचे मत मात्र वेगळे आहे. जर्मनीचे मुख्य विषाणूशास्त्रतज्ञ ख्रिस्तीयन ड्रॉस्टेन यांनी सांगितले की, मोठ्या मुलांमुळे संसर्ग होत नाही असा निष्कर्ष काढण्याइतपत आकडेवारी नाही. मुलांना संसर्ग झाला का आणि असल्यास तो कसा पसरू शकतो याची उत्तरे वेगवेगळ्या अभ्यासानुसार वेगवेगळ्या पद्धतीने मिळाली आहेत.

इंग्लंडमध्ये मनाई कायम
इंग्लंडचे आरोग्य मंत्री मॅट हॅनकॉक यांनी आजी-आजोबांच्या संपर्कात येऊ नये हा सल्ला कायम असल्याचे स्पष्ट केले. संपूर्ण कुटुंबाच्या साथीत वेळ व्यतीत करण्याचे महत्त्व आम्हाला पूर्णपणे मान्य आहे, पण ज्या लोकांना संसर्ग होण्याचा धोका आहे त्यांच्या जीवाची काळजी घेत राहणे महत्त्वाचे आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Read what the Swiss government has good news for these two classes