जगप्रसिद्ध मास्टरशेफचा कोरोनाने मृत्यू

वृत्तसंस्था
गुरुवार, 26 मार्च 2020

भारतीय खाद्यसंस्कृती जगभरात नेणारे मास्टरशेफ म्हणून कार्डोज यांची ओळख होती. कार्डोज हे 59 वर्षाचे होते. मुळचे भारतीय असलेले कार्डोज हे अमेरिकेतील न्यू जर्सीमध्ये राहत होते. कार्डोज हे काही दिवसांपूर्वीच मुंबईतही आले होते.

नवी दिल्ली : 'बॉम्बे कॅन्टीन', 'ओ पेड्रो' आणि 'बॉम्ब स्वीट शॉप' अशी प्रसिद्ध रेस्टॉरंट चालविणारे प्रसिद्ध मास्टरशेफ फ्लॉइड कार्डोज यांचा कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. 

भारतीय खाद्यसंस्कृती जगभरात नेणारे मास्टरशेफ म्हणून कार्डोज यांची ओळख होती. कार्डोज हे 59 वर्षाचे होते. मुळचे भारतीय असलेले कार्डोज हे अमेरिकेतील न्यू जर्सीमध्ये राहत होते. कार्डोज हे काही दिवसांपूर्वीच मुंबईतही आले होते. मुंबईत त्यांनी एका पार्टींचंही आयोजन केले होते. पार्टीत एकूण 200 जण सहभागी असल्याचे सांगितले जात आहे. 8 मार्चपर्यंत फ्लॉएड भारतात होते. भारतातून अमेरिकेत पोहोचल्यानंतर त्यांना 18 मार्च रोजी कोरोनाची लागण झाली. त्यानंतर त्यांना न्यूयॉर्कच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची तपासणी केली असता त्यांना कोरोना झाल्याचे समोर आले.

कार्डोज यांनी इन्स्टाग्रामवरील पोस्टमध्ये सर्वांची माफीही मागितली आहे. त्यांच्यामागे आई बेरील, पत्नी बरखा आणि मुले जस्टीन आणि पीटर असा परिवार आहे. मुंबई प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांनी स्वित्झर्लंडमध्ये जाऊन फ्रेंच, इटालियन, इडियन खाद्यपदार्थांचे प्रशिक्षण घेतले. त्यांनी न्यूयॉर्कमध्ये रेस्टॉरंट सुरु केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: renowned chef Floyd Cardoz passes away at 59 due to coronavirus