esakal | स्पेनमधील बच्चे कंपनीचे लवकरच हुर्रे! - अदा बॅलॅनो
sakal

बोलून बातमी शोधा

Child

कोरोना महामारीमुळे उद्भवलेल्या अत्यंत खडतर टप्यातून आपण बाहेर पडलो आहोत, पण आपण जे काही साध्य केले ते अपुरे आहे. मुख्य म्हणजे आपली स्थिती अजूनही कमकुवत आहे. घाईने निर्णय घेऊन ती हाताबाहेर घालवून चालणार नाही. घरातून बाहेर पडून मुलांना मोकळ्या हवेत फिरण्याचा आनंद मिळायला हवा. संसर्ग टाळण्यासाठी हे मर्यादित प्रमाणावर संघटित पद्धतीने केले जाईल. याचा तपशील लवकरच ठरेल.
- पेड्रो सॅंचेझ, स्पेनचे पंतप्रधान

स्पेनमधील बच्चे कंपनीचे लवकरच हुर्रे! - अदा बॅलॅनो

sakal_logo
By
पीटीआय

बार्सिलोना - ‘आता आणखी वाट पाहू नका. आपल्या बालगोपालांची सुटका करा. मी महापौर तसेच नऊ व तीन वर्षांच्या मुलांची आई म्हणूनही बोलतेय. या मुलांना महिनाभराहून जास्त काळ बाहेर पडता आलेले नाही. आपण एकही दिवस का बाहेर पडू शकलो नाही हे त्यांना कळत नाही. ममा, मला संसर्ग झाला नसेल तर मी कुणाचेही नुकसान करू शकत नाही. का, का, मग मी का नाही बाहेर पडू शकत. मला दोष देऊ नका. मुलांना नैराश्‍याचे झटके येतात. त्यांचा राग उफाळून येतो. वेळापत्रक आखणे, आदेश नक्की करणे, होमवर्क किंवा काहीच कालबद्ध उपक्रमाचे नियोजन करणे अशक्‍य आहे. या मुलांनी घराबाहेर पडण्याची गरज आहे,’’ अशी साद बार्सिलोनाच्या महापौर अदा कोलाऊ बॅलॅनो यांनी पंतप्रधानांकडे केली आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बार्सिलोनाच्या महिला महापौर अदा यांच्या या भावपूर्ण वक्तव्याचे पडसाद ४८ तासांत उमटले आहेत. स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सॅंचेझ यांनी मुलांचा बंदीवास सुसह्य करण्याचे प्रॉमिस दिले आहे. १४ मार्चपासून लॉकडाउन झालेली मुले २७ एप्रिलपासून बाहेर पडू शकतील. त्याविषयीचा तपशील लवकरच ठरेल, असे त्यांनी सांगितले.

अदा यांचे बोल परिणामकारक ठरले, कारण त्यांनी लॉकडाउनचा कुटुंबातील प्रत्येक सदस्यावर झालेला परिणाम मुद्देसूद पद्धतीने मांडला. मुलांच्या मानसशास्त्रीय आरोग्याची काळजी वाटते, असे त्या म्हणाल्या.

बालरोगतज्ज्ञांचा सल्ला
स्पेनमध्ये सुमारे आठ लाख मुले आहेत. यातील अनेक जण ४३० ते ५४० चौरस फूट क्षेत्रफळ असलेल्या घरांत राहतात. १२ वर्षांखालील मुलांना बाहेर पडता यावे व यासाठी काळजी घ्यावी म्हणून बालरोगतज्ज्ञांचा सल्ला घेण्यात येईल.

loading image