लॉकडाउन नाकारणारा स्वीडन

पीटीआय
Monday, 13 April 2020

स्वीडनने काय केले

  • लोकांना हात धुण्यासाठी प्रोत्साहन दिले
  • आजारी असणाऱ्यांना घरीच थांबविले
  • रेस्टॉरंटमध्ये गर्दी टाळण्यासाठी नियम
  • शाळेतही विद्यार्थ्यांच्या संख्येवर निर्बंध
  • वाहनांमधील प्रवाशांवर निर्बंध
  • सामाजिक विलगीकरणास लोकांना प्रवृत्त केले
  • लोकांना सामूहिक कार्यक्रम रद्द केले
  • सत्तरपेक्षा अधिक वय असणाऱ्यांना घरी बसविले
  • चाळीस टक्के कर्मचाऱ्यांचे ‘वर्क फ्रॉम होम’

कोरोनाच्या संसर्गापुढे बहुतांश युरोपियन देशांनी हात टेकत लॉकडाउनचा मार्ग स्वीकारला असताना स्वीडनसारखा छोटा देश मात्र याला अपवाद ठरला आहे. स्वीडनमधील रेस्टॉरंट आणि बार पूर्वीसारखे खुले झाले असून शाळा आणि मैदानेही मुलांसाठी खुल्या झाल्या आहेत. स्वीडन सरकारच्या या भूमिकेवर अमेरिकेने टीका केली असली तरीसुद्धा तेथील सरकार मात्र आपल्या भूमिकेवर ठाम आहे. स्वीडनमधील उपाययोजनेसंदर्भात परराष्ट्रमंत्री ॲन लिंड म्हणाल्या की, ‘‘ अमेरिका सांगते त्याप्रमाणे आम्ही लोकांच्या एकत्रित रोगप्रतिकार क्षमतेच्या सिद्धांताचा अवलंब केलेला नाही. आम्ही लॉकडाउनवर विसंबून न राहता लोकांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देतो आहोत. त्यामुळेच आम्हाला हे यश मिळवता आले आहे.’’

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

धोरणात बदल
९ एप्रिल रोजी स्वीडनमधील बाधितांची संख्या ९ हजार १४१ एवढी होती तर ७९३ जण मरण पावले होते.  याचवेळी शेजारच्या स्पेनमध्ये लॉकडाउनची घोषणा करण्यात आली. पण स्वीडन सरकारने आपल्या धोरणात बदल केला, लोकांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून दिल्याने ही स्थिती नियंत्रणात आली.

संशोधकांना भीती 
आता बार आणि रेस्टॉरंटमधील लोकांची गर्दी वाढल्याने काही संशोधक आणि वैद्यकीय चिकित्सकांनी सरकारने आणखी कठोर नियम आखावेत अशी सूचना केली आहे. शॉपिंग मॉलमधील गर्दी वाढल्याने संसर्ग आणखी वाढू शकतो अशी भीती त्यांना सतावते आहे.

गणितीय अंदाजाची भीती
स्टॉकहोम विद्यापीठातील सांख्यिकीतज्ज्ञ टॉम ब्रिटन यांनी एक स्वतंत्र गणितीय आराखडा तयार केला आहे.  संसर्गजन्य आजारांचा लोकसंख्येवर नेमका कसा परिणाम होतो हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे.  ब्रिटन यांच्या मते या महिन्याच्या अखेरपर्यंत स्वीडनमधील चाळीस टक्क्यांपेक्षाही अधिक लोकसंख्या ही बाधित  झालेली असेल. सध्या हे प्रमाण दहा टक्के एवढे असावे असा त्यांचा अंदाज आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांची टीका आम्ही निरर्थक ठरविली असून स्वीडिश आरोग्य यंत्रणा विद्यमान स्थिती अगदी चांगल्या पद्धतीने हाताळते आहे.
- अँडर्स टेगनेल, वैद्यकीय संशोधक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: swindon which refuses lockdown