Coronavirus : दहशतवाद्यांनाही दहशत

पीटीआय
Monday, 16 March 2020

पाकमध्ये ३४ जणांना संसर्ग
पाकिस्तानमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग हातपाय पसरू लागला असून, येथील लागण झालेल्यांची संख्या आता ३४ वर पोचली आहे. अमेरिकेमधून आलेल्या एका दाम्पत्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे स्थानिक माध्यमांनी म्हटले आहे. बलुचिस्तानमध्ये सर्वाधिक म्हणजे दहा जणांना या विषाणूचा संसर्ग झाला आहे.

लंडन - जगातील सर्वांत क्रूर दहशतवादी संघटना म्हणून ‘इसिस’ची ओळख आहे. मात्र, कोरोना व्हायरसने या दहशतवाद्यांनाही भीती घातली असून, संसर्गाच्या धास्तीने या संघटनेने आपल्या दहशतवाद्यांच्या प्रवासावर निर्बंध घातले आहेत. 

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

काही दिवसांपर्यंत, ‘युरोपमध्ये हल्ले करा’, असा आदेश देणाऱ्या या संघटनेने ‘संसर्गग्रस्त युरोप’मध्ये जाऊ नका, असे त्यांच्या सदस्यांना सांगितले आहे. तसेच, जे दहशतवादी युरोपमध्ये आहेत, त्यांनी तेथून बाहेर पडू नये, असेही सांगण्यात आले आहे. देवाने त्याच्या इच्छेनुसारच हे संकट पाठविले असून तुम्ही स्वत:ची काळजी घ्या, असे ‘इसिस’ने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे. 

म्हणून, युरोपमध्ये वाढतायत कोरोनाचे बळी; इटली, फ्रान्समध्ये चिंताजनक स्थिती

चीनमध्येही विलगीकरण
अन्य देशांप्रमाणेच चीनदेखील आता परदेशातून आलेल्या नागरिकांना सोमवारपासून वेगळे ठेवणार आहे. या नागरिकांना दोन आठवड्यांसाठी घरामध्येच वेगळे ठेवण्यात येईल, असे स्थानिक वर्तमानपत्राने प्रसिद्ध केलेल्या वृत्तात म्हटले आहे. परदेशी नागरिकांची विमानतळांवरच कसून तपासणी घेतली जात असून सर्व विमानांचे मार्ग बदलून ते 
बीजिंगमधील विमानतळावर आणले जात आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Terrorists also panic