जहाजांवर अडकले हजारो भारतीय खलाशी

पीटीआय
Tuesday, 14 April 2020

कोरोनाच्या संकटापासून बचाव व्हावा म्हणून अवघ्या जगाने लॉकडाउनचा मार्ग स्वीकारला असून हवाई सेवेप्रमाणे जलवाहतुकीवर देखील याचा विपरीत परिणाम झाला आहे. सगळया जगातील जल वाहतूक ठप्प झाली असून  विविध जहाजांवर चाळीस हजारांवर भारतीय खलाशी आणि अन्य कर्मचारी अडकून पडल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.

लंडन - कोरोनाच्या संकटापासून बचाव व्हावा म्हणून अवघ्या जगाने लॉकडाउनचा मार्ग स्वीकारला असून हवाई सेवेप्रमाणे जलवाहतुकीवर देखील याचा विपरीत परिणाम झाला आहे. सगळया जगातील जल वाहतूक ठप्प झाली असून  विविध जहाजांवर चाळीस हजारांवर भारतीय खलाशी आणि अन्य कर्मचारी अडकून पडल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ही सगळी मंडळी मालवाहू आणि काही प्रवासी जहाजांवर काम करत आहेत, आता लॉकडाउनमुळे त्यांना मायदेशी परतणे अवघड झाले आहे अशी माहिती सूत्रांनी दिली.  सध्या अमेरिकेतील मियामी बंदरावर अडकून पडलेल्या डिव्हाइन क्रूझवरील कर्मचारी आनंदकुमार यांनी भारत सरकारने आम्हाला समुद्रातच सोडले असल्याची खंत व्यक्त 
केली आहे. 

आम्हाला मायदेशी यायचे आहे, आम्ही तिथे विलगीकरणात राहायला तयार आहोत,पण सरकारने आम्हाला किमान मायदेशी तरी आणावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कुमार यांनी वॉशिंग्टनमधील भारतीय दूतावासाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण तिथे देखील त्यांच्या पदरी निराशाच आली.  सरकारकडून अद्याप आम्हाला कोणताही निरोप आला  नसल्याचे सांगण्यात आले. देशातील  जहाज मालक, व्यवस्थापक आणि एजन्ट यांच्या संघटनेने जगभरात विविध जहाजांवर ४०, हजारांपेक्षा अधिक कर्मचारी आणि खलाशी अडकून पडले असल्याचे म्हटले आहे.  

भारतात देखील लॉकडाउन असल्याने विमानातून देखील त्यांना परतणे शक्य होणार नाही असे या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. बऱ्याच जहाज कंपन्या भारतीय कर्मचाऱ्यांना मायदेशी सोडायला तयार आहेत पण भारत सरकारनेच त्याला नकार दिला आहे. सध्या देशातच लॉकडाऊन असल्याने सरकार जोखीम घ्यायला तयार नाही असे गोवा सीमेन असोसिएशन ऑफ इंडियाचे संस्थापक  डिक्सन वाझ  यांनी सांगितले. 

सध्या अटलांटिक महासागरात असलेल्या जहाजांवरील दोन भारतीय खलाशांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. सध्या इटलीतील एका क्रूझवर अडकून पडलेल्या राहूल शानबाग यांनी सांगितले की ‘आमच्या जहाजावरील अन्य देशांचे कर्मचारी त्यांच्या मायदेशी  परतले असून आम्हीच इथे अडकून पडलो आहोत. आता आम्हाला देखील या जहाजावर संसर्गाची भीती वाटू लागली आहे.’

लॉकडाउनमुळे परतीचे सर्व मार्ग बंद
जहाजांवरदेखील संसर्गाचा धोका वाढला


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thousands of Indian sailors boarded the ship