Coronavirus : ट्रम्प यांचे WHOवर गंभीर आरोप; घेतला 'हा' मोठा निर्णय

वृत्तसंस्था
Wednesday, 8 April 2020

जगभरात कोरोना व्हायरसमुळे हाहाकार माजला असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेवर (WHO)गंभीर आरोप केले आहेत. जागतिक आरोग्य संघटना चीनकडे जास्त लक्ष केंद्रीत करत असल्याचा आरोप आहे. अमेरिकडून जागतिक आरोग्य संघटनेला मिळणारा निधी रोखण्यात येणार असल्याचा निर्णय घेणार असल्याचेही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.

न्यूयॉर्क : जगभरात कोरोना व्हायरसमुळे हाहाकार माजला असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेवर (WHO)गंभीर आरोप केले आहेत. जागतिक आरोग्य संघटना चीनकडे जास्त लक्ष केंद्रीत करत असल्याचा आरोप आहे. अमेरिकडून जागतिक आरोग्य संघटनेला मिळणारा निधी रोखण्यात येणार असल्याचा निर्णय घेणार असल्याचेही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ट्रम्प म्हणाले जागतिक आरोग्य संघटनेला अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणात निधी पुरविला जातो. ज्यावेळी प्रवासावर निर्बंध घातले होते, त्यावेळी त्यांनी माझ्यावर टीका आणि त्याबद्दल असहमती दर्शविली होती. बऱ्याच गोष्टींबद्दल ते चुकीचे होते. ते जास्तकरुन चीनला केंद्रित करत असल्याचे दिसून येते. आमच्याकडून जागतिक आरोग्य संघटनेवर खर्च होणाऱ्या निधीवर नियंत्रण आणत आहोत, असे त्यांनी सांगितले

Coronavirus : कोरोनाची सुरुवात झाली त्या चीनची सध्या काय आहे परिस्थिती?

दरम्यान, अमेरिकेत कोरोनाग्रस्तांचा आकडा झपाट्याने वाढत असून अनेक भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यामधील अनेकांचा मृत्यूही झाला आहे. अमेरिकेत कोरोनाने  आतापर्यंत एकूण १२७२२ लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेतील परिस्थिती दिवसेंदिवस कोरोनामुळे गंभीर होत चालली आहे. अमेरिकेत गेल्या २४ तासांत कोरोनामुळे दोन हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. जॉन्स हॉपकिन्सच्या आकडेवारीनुसार, अमेरिकेत आतापर्यंत तीन लाखांहून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर आतापर्यंत अमेरिकेत १२७२२ लोकांचा मृत्यू झाला आहे. जगभरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. जगभरात कोरोनामुळे आतापर्यंत ८१ हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Trump Attacks WHO Over Criticisms of US Approach to Coronavirus