डोनाल्ड ट्रम्प यांची भूमिका बदलली; करताहेत भारताचे कौतुक

वृत्तसंस्था
Wednesday, 8 April 2020

वॉशिंग्टन : कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी जगभरातील सर्वच देशांकडून प्रयत्न केले जात आहेत. हायड्रोक्सी क्लोरोक्वाईन या औषधाच्या माध्यमातून कोरोनावर उपचार केले जात आहेत. त्यामुळे या औषधाची मागणी मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. याच्या पुरवठ्यावरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारताला इशारा देणार होते. मात्र, भारतानेही त्यास चोख प्रत्युत्तर दिले होते. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अमेरिकेकडून हायड्रोक्सी क्लोरोक्वाईन या औषधाची मागणी करण्यात आली होती. ही मागणी भारताने मान्य केली. पण हायड्रोक्सी क्लोरोक्वाईन या औषधाच्या पुरवठ्यावरुन अमेरिकेकडून टोकाची भाषा वापरण्यात आली होती. त्यास भारत सरकारनेही चोख उत्तर दिले होते. त्यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या भूमिकेत अचानक बदल झाला आहे. ट्रम्प यांनी हायड्रोक्सी क्लोरोक्वाईन या औषधासंबंधी नरेंद्र मोदी सरकारच्या भूमिकेचे समर्थन केले आहे. तसेच कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी भारत सरकारने उचललेल्या पावलांचेही कौतुक केले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी फॉक्स न्यूजला मुलाखत दिली होती. त्यामध्ये त्यांनी हे वक्तव्य केले. 

लाखो डोसची खरेदी : डोनाल्ड ट्रम्प

कोरोना व्हायरसवर उपचारासाठी लाखो डोस खरेदी केले आहेत. दोन कोटी ९० लाखांपेक्षा जास्त डोस खरेदी केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर फोनवरुन चर्चा केली. भारतातून भरपूर औषधे येणार आहेत. तुम्ही निर्बंध हटवू शकता का? असे मी मोदींना विचारले. ते महान आहेत. ते खूपच चांगले आहेत. भारतासाठी औषधांची आवश्यकता असल्याने त्यांनी हे निर्बंध घातले होते, असेही ट्रम्प म्हणाले.
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Trump changes course backs Indias position on hydroxychloroquin