
जगभरात कोरोना व्हायरसच्या विषाणूंनी थैमान घातलेले असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची दुसऱ्यांदा कोरोना चाचणी करण्यात आली. या चाचणीत त्यांचा रिपोर्ट दुसऱ्यांदा निगेटिव्ह आला आहे.
वॉशिंग्टन : जगभरात कोरोना व्हायरसच्या विषाणूंनी थैमान घातलेले असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची दुसऱ्यांदा कोरोना चाचणी करण्यात आली. या चाचणीत त्यांचा रिपोर्ट दुसऱ्यांदा निगेटिव्ह आला आहे.
बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
याआधीही डोनाल्ड ट्रम्प यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यावेळी सुद्धा त्यांच्या चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. गेल्या काही दिवसांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्राझिलच्या राष्ट्रपतींच्या प्रेस सेक्रेटरींची भेट घेतली होती. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी करोनाची चाचणी करावी अशी चर्चा होत होती. या चर्चेनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी पहिली कोरोना चाचणी केली. मात्र, ती निगेटिव्ह आली होती.
तबलिगी जमातने पाकिस्तानची उडविली झोप; ४१ हजार जणांना शोधण्याचे लक्ष
गेल्या महिन्यात डोनाल्ड ट्रम्प यांनी फ्लोरिडामधील एका रिसॉर्टमध्ये ब्राझिलचे राष्ट्रपती जेर बोलसोनारो आणि त्यांचे प्रेस सेक्रेटरी फॅबियो वाजेनगार्टन यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर ब्राझिलला गेल्यानंतर फॅबिओ वाजेनगार्टन यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. तर राष्ट्रपती जेर बोलसोनारो यांनी चाचणी निगेटिव्ह आली. त्यामुळे फॅबिओ वाजेनगार्टन यांच्या संपर्कात आल्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनीही कोरोनाची चाचणी केली.
राज्यात कोरोनासाठी 30 विशेष रुग्णालये; कोणतं रुग्णालय तुमच्या जवळ?
दरम्यान, कोरोना व्हायरसने आतापर्यंत जगभरात ५३ हजार दोनशे ३८ जणांचा बळी घेतला आहे. तर दहा लाख १६ हजार ४१३ जणांना या रोगाचा संसर्ग झाला आहे. तर आतापर्यंत जगभरात दोन लाख १३ हजार ३५ जण कोरानामुक्त झाले आहेत. कोरोना व्हायरसचा सर्वाधिक फटका इटली, स्पेन आणि अमेरिकेला बसला आहे. आर्थिक महासत्ता असणाऱ्या अमेरिकेनंही या रोगाची धास्ती घेतली आहे. अमेरिकेत दोन लाख ४४ हजार ८७७ जणांना करोनाची लागण झाली आहे तर आतापर्यंत सहा हजांरापेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.