Coronavirus : आता दोन खासदारांना कोरोनाची लागण

वृत्तसंस्था
गुरुवार, 19 मार्च 2020

कोरोनाची दहशत कायम

वॉशिंग्टन : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. चीनच्या वुहान शहरातून पसरलेला कोरोना व्हायरस सध्या जगातील सर्वात मोठी समस्या बनत आहे. या व्हायरसच्या विळख्यात अनेकजण सापडले आहेत. त्यानंतर आता दोन खासदारांना याची लागण झाली आहे.

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

चीन, भारत, इटली, इराक, अमेरिकेसह अनेक देशात कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळत आहेत. या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. चीननंतर इटलीतील अनेक कोरोनाग्रस्तांना मृत्यू झाला. त्यानंतर आता अमेरिकेतील 150 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तसेच आतापर्यंत दहा हजारांपेक्षा अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. दोन खासदारांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. 

कोरोनाची दहशत कायम

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोनाला राष्ट्रीय आरोग्य आपत्ती घोषित केली. कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी अमेरिकन सीनेटने 100 अरब डॉलरचा आपत्कालीन निधीला मान्यता दिली. मात्र, सध्या सगळीकडेच कोरोनाची दहशत कायम आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two US House Members Test Positive for the Coronavirus