esakal | चिंताजनक : इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आयसीयूत दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

UK PM Boris Johnson admitted to intensive care for coronavirus treatment

इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांची परिस्थिती खालावली असून त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. त्यांनी स्वतःच एका ट्विटद्वारे ही माहिती दिली होती. त्यानंतर त्यांनी स्वतःला विलगीकरण केल्यानंतरही त्यांच्या प्रकृतीत कुठल्याही प्रकारची सुधारणा झाली नाही.

चिंताजनक : इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आयसीयूत दाखल

sakal_logo
By
वृत्तसंस्था

लंडन : इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांची परिस्थिती खालावली असून त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. त्यांनी स्वतःच एका ट्विटद्वारे ही माहिती दिली होती. त्यानंतर त्यांनी स्वतःला विलगीकरण केल्यानंतरही त्यांच्या प्रकृतीत कुठल्याही प्रकारची सुधारणा झाली नाही.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

त्यानंतर सोमवारी त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले होते. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच जॉन्सन यांची प्रकृती आणखी खालावली त्यामुळे त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. २७ मार्च रोजी बोरिस जॉन्सन यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होते. कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर पंतप्रधान जॉन्सन यांनी स्वतःला विलग करून घेतलं होतं. तेथूनच ते संपूर्ण काम बघत होते.

विलगीकरण कक्षात असूनही त्यांचा ताप कमी होत नसल्यानं त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले. ६ एप्रिल रोजी त्यांना रुग्णालयात हलवण्यात आलं. त्यानंतर उपचार सुरू असताना जॉन्सन यांच्या प्रकृतीत आणखी बिघाड झाली. त्यामुळे त्यांना तातडीनं अतिदक्षता विभागात हलवण्यात आलं आहे. जॉन्सन यांच्यावर सेंट थॉमस हॉस्पिटलमध्ये सध्या उपचार सुरू आहेत. 

Coronavirus : इंग्लंडचे बोरिस जॉन्सन रुग्णालयात दाखल

दरम्यान, जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूची जगभरातील अनेक नामवंत व्यक्तींनाही लागण होत आहे. यात अनेकांचा मृत्यू झाला असून, काही जण त्यावर मात करून बरे झाले आहेत. कोरोनाग्रस्त रुग्णांच्या वाढत्या संख्येनं सगळ्यांचीच चिंता वाढली आहे.

loading image