Coronavirus : अमेरिकेत कोरोनाचा हाहाकार, तब्बल १२७२२ लोकांचा मृत्यू; तर...

वृत्तसंस्था
Wednesday, 8 April 2020

कोरोना व्हायरसने जगभरात धुमाकूळ घातला आहे. अशात अमेरिकेसारख्या महासत्ता देशासह अनेक जगभरातील देशांना कोरोनाचा फटका बसला आहे. अमेरिकेत कोरोनाने धुमाकूळ घातला असून आतापर्यंत एकूण १२७२२ लोकांचा मृत्यू झाला आहे.

वॉशिंग्टन : कोरोना व्हायरसने जगभरात धुमाकूळ घातला आहे. अशात अमेरिकेसारख्या महासत्ता देशासह अनेक जगभरातील देशांना कोरोनाचा फटका बसला आहे. अमेरिकेत कोरोनाने धुमाकूळ घातला असून आतापर्यंत एकूण १२७२२ लोकांचा मृत्यू झाला आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अमेरिकेतील परिस्थिती दिवसेंदिवर कोरोनामुळे गंभीर होत चालली आहे. अमेरिकेत गेल्या २४ तासांत कोरोनामुळे दोन हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. जॉन्स हॉपकिन्सच्या आकडेवारीनुसार, अमेरिकेत आतापर्यंत तीन लाखांहून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर आतापर्यंत अमेरिकेत १२७२२ लोकांचा मृत्यू झाला आहे. जगभरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. जगभरात कोरोनामुळे आतापर्यंत ८१ हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

चिंताजनक : इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आयसीयूत दाखल

जगातील एकूण मृत्यूपैकी जवळपास ५० हजारहून जास्त लोकांचा मृत्यू युरोपीयन देशांमध्ये झाला आहे. स्वीडनमध्ये गेल्या २० तासांत १०० हून जास्त कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. तर फ्रान्समध्येही कोरोनामुळे मृतांच्या आकडा दहा हजार पार केला आहे. भारतात सुद्धा कोरोनोमुळे चिंता वाढली आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत सतत वाढ होत आहे. देशात आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या ४७८४ वर पोहोचली आहे. तर १२४ लोकांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय, कोरोनावर मात करत आतापर्यंत ३२५ लोक या आजारातून बरे झाले आहेत.

राज्यात कोरोनाग्रस्त रुग्ण हजार प्लस; दिवसात १५० रुग्ण वाढले

दरम्यान, जगभरातील बहुतांश देशांमध्ये कोरोनावर मात करण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. परंतु, लॉकडाउन करुनही परिस्थिती आटोक्यात येताना दिसत नाही. भारतातही कोरोनाग्रस्तांची संख्या ५०००च्या वर गेली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: US reports nearly 2000 Coronavirus deaths in last 24 hours