दिलासादायक ! संशोधकांना कोरोनावर औषध सापडलं?

वृत्तसंस्था
Sunday, 5 April 2020

कोरोनामुळे जगातील तब्बल 206 देश हतबल झाले आहेत. या सर्व देशांमध्ये मिळून कोरोनामुळे मृतांचा आकडा 60 हजारांपेक्षा जास्त झाला आहे. मृत्यूचं प्रमाण जास्त असण्याचं कारण म्हणजे यावर अद्याप कोणतीच लस किंवा उपचार नाही. जगात याच्या उपचारावर आणि लसीवर संशोधन सुरू आहे. यात एक आशेचा किरण सापडला आहे. ऑस्ट्रेलियाचे वैज्ञानिक यावर औषध शोधण्याचा जवळ पोहोचले आहेत.

सिडनी : कोरोनामुळे जगातील तब्बल 206 देश हतबल झाले आहेत. या सर्व देशांमध्ये मिळून कोरोनामुळे मृतांचा आकडा 60 हजारांपेक्षा जास्त झाला आहे. मृत्यूचं प्रमाण जास्त असण्याचं कारण म्हणजे यावर अद्याप कोणतीच लस किंवा उपचार नाही. जगात याच्या उपचारावर आणि लसीवर संशोधन सुरू आहे. यात एक आशेचा किरण सापडला आहे. ऑस्ट्रेलियाचे वैज्ञानिक यावर औषध शोधण्याचा जवळ पोहोचले आहेत.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ऑस्ट्रेलियात वैज्ञानिकांनी लॅबमध्ये कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या पेशीमधून धोकादायक व्हायरसला 48 तासांमध्ये संपवलं आहे. तेसुद्धा अशा औषधापासून जे पहिल्यापासून उपलब्ध आहे. संशोधकांना असं आढळून आलं की, जगात पहिल्यापासूनच असं एक अँटिपॅरासाइट ड्रग आहे ज्याने कोरोना व्हायरस संपवला. कोरोना व्हायरसवर उपचाराच्या दिशेनं पडलेलं हे पहिलं यशस्वी पाऊल ठरणार आहे. याची वैद्यकीय चाचणी अद्याप बाकी असल्याचं संशोधकांनी सांगितलं आहे.

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ६२५; कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण

इवरमेक्टिन नावाच्या औषधाचा फक्त एक डोस कोरोनासह सर्व व्हायरल आरएनएला 48 तासात संपवू शकतो. जर संसर्ग जास्त नसेल तर व्हायरस 24 तासांच्या आतही संपुष्टात येऊ शकतो. आरएनए व्हायरस त्या व्हायरसला म्हटलं जातं ज्यांच्या जेनेटिक मटेरियलमध्ये आरएनए असतं. आरएनए म्हणजे रिबो न्यूक्लिक अॅसिड. हे संशोधन ऑस्ट्रेलियाच्या मोनाश युनिव्हर्सिटीच्या कायली वॅगस्टाफ यांच्यासह इतर वैज्ञानिकांनी केलं आहे.

Coronavirus : पंतप्रधान मोदी साधणार विरोधी पक्षाच्या नेत्यांशी संवाद

वैज्ञानिकांनी म्हटलं की, इवरमेक्टिन एक असं अँटि पॅरासाइट ड्रग आहे जे एचआयव्ही, डेंग्यू, इन्फ्लुएन्झा, जीका व्हायरस सारख्या अनेक व्हायरसवर प्रभावी ठरलं आहे. मात्र हे संशोधन लॅबमध्ये झालं असून याची लोकांवर चाचणी करण्याची गरज आहे असं मतही त्यांनी नोंदवलं. इवरमेक्टिनचा वापर मोठ्या प्रमाणात होतो आणि हे सुरक्षित औषधही मानलं जातं. आता त्याच्या डोस कोरोना व्हायरसची लागण झालेल्या व्यक्तीवर कितपत यशस्वी ठरतो ते तपासण्याची गरज आहे. हा संशोधनाचा पुढचा टप्पा असल्याचं वैज्ञानिकांनी म्हटलं आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: When will a coronavirus vaccine be ready?