Coronavirus : संसर्गाला सुरवात कोठून?

वृत्तसंस्था
Saturday, 11 April 2020

कोरोनाविषाणूच्या संसर्गाबाबत चीनने फार उशीरा माहिती दिल्याने जगभरात त्याचा फैलाव झाला, असा अमेरिकेचा आरोप असून या आरोपाला पुष्टी देण्यासाठी पुरावे शोधण्याचे काम सुरु आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर जाहीरपणे आरोप करण्याच्या पूर्वीच गेल्या वर्षी नोव्हेंबरपासूनच अमेरिकेतील गुप्तचर संस्था कोरोना संसर्गाची सुरवात कोठे झाली, याचा शोध घेत आहेत.

वॉशिंग्टन - कोरोनाविषाणूच्या संसर्गाबाबत चीनने फार उशीरा माहिती दिल्याने जगभरात त्याचा फैलाव झाला, असा अमेरिकेचा आरोप असून या आरोपाला पुष्टी देण्यासाठी पुरावे शोधण्याचे काम सुरु आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर जाहीरपणे आरोप करण्याच्या पूर्वीच गेल्या वर्षी नोव्हेंबरपासूनच अमेरिकेतील गुप्तचर संस्था कोरोना संसर्गाची सुरवात कोठे झाली, याचा शोध घेत आहेत.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

मात्र, अद्यापही संसर्गाची सुरवात कशी झाली, कधी झाली याबाबत माहिती मिळालेली नाही. मात्र, गेल्या वर्षी ३१ डिसेंबरला या विषाणूबाबत सर्व जगाला माहिती झाली आणि तेव्हापासून वाढणाऱ्या रुग्णसंख्येने आणि मृत्युसंख्येने सर्वच देशांच्या काळजाचा ठोका चुकविला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Where the infection started