Coronavirus : अमेरिकी राष्ट्राध्यक्षांच्या मुलींकडूनच लॉकडाऊनचे उल्लंघन

पीटीआय
Monday, 20 April 2020

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या इवांका ट्रम्प यांनी एक गंभीर प्रकार केला असून त्यांनी लॉकडाउनच्या नियमांचे उल्लंघन केले आहे. यहूदी सणावर पासोवरच्या निमित्ताने ती आपला पती जेरेड कुश्नर याच्यासहित बॅडमिस्टर येथील ट्रम्प यांच्या गोल्फ रिसॉर्टमध्ये गेली होती. त्यावेळी त्यांच्याकडून हे लॉकडाऊनचे उल्लंघन झाले आहे.

वॉशिंग्टन - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या इवांका ट्रम्प यांनी एक गंभीर प्रकार केला असून त्यांनी लॉकडाउनच्या नियमांचे उल्लंघन केले आहे. यहूदी सणावर पासोवरच्या निमित्ताने ती आपला पती जेरेड कुश्नर याच्यासहित बॅडमिस्टर येथील ट्रम्प यांच्या गोल्फ रिसॉर्टमध्ये गेली होती. त्यावेळी त्यांच्याकडून हे लॉकडाऊनचे उल्लंघन झाले आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ही गोष्ट समोर आल्यानंतर इवांका ट्रम्प यांच्यावर जोरदार टीका झाली आहे. कारण, ती स्वत: देशाला लॉकडाऊनचे पालन करण्याचे आवाहन करत आहे. हा वाढता वाद पाहता व्हाईट हाऊस तिच्या मदतीला धावले आहे. हे लॉकडाऊन तोडणं कसे अयोग्य नव्हते हे समजावून सांगण्याचा प्रयत्न होत आहे. पण, सर्वसामान्य जनतेला हे पचवणे खूप कठीण जात आहे. नियम तोडणाऱ्या इवांका आणि तिच्या पतीवर टीका होत आहे. इवांका आणि त्यांचे पती हे केवळ ट्रम्प यांची मुलगी असल्याने ही टीका नसून हे दोघेही व्हाइट हाऊसमध्ये वरिष्ठ सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. या दोघांना पदावरुन हटवण्याची मागणी देखील नागरिक करत आहेत. ट्रम्प यांच्या विरोधकांनी देखील या प्रकरणावरुन निशाणा साधला आहे.

दरम्यान, न्यूझीलंडचे आरोग्य मंत्री डेविड क्लार्क यांनी लॉकडाऊनचे उल्लंघन केल्यानंतर त्यांच्यावर जगभरातून टीका झाली. यानंतर त्यांनी स्वत:ला मुर्ख देखील म्हटले होते. त्यानंतर आता इवांका यांनी या नियमांचे उल्लंघन केले आहे. आता त्यांच्यावरही जगभरातून टीका होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: White House defends Ivanka Trump's personal travel amid lockdown