व्हाइट हाउसच्या अधिकाऱ्याने चीनवर काय केले आरोप; वाचा?

वृत्तसंस्था
Wednesday, 22 April 2020

कोरोना महामारीवरून अमेरिकेने चीनवर पुन्हा एकदा तोफ गाडली आहे. जानेवारी-फेब्रुवारीत पीपीइ किट्स आणि मास्कची तब्बल १८ पट जादा खरेदी करून चीन आता ती चढ्या दराने विकत असल्याचा आरोप व्हॉइट हाउसच्या उच्च अधिकाऱ्याने केला.

वॉशिंग्टन - कोरोना महामारीवरून अमेरिकेने चीनवर पुन्हा एकदा तोफ गाडली आहे. जानेवारी-फेब्रुवारीत पीपीइ किट्स आणि मास्कची तब्बल १८ पट जादा खरेदी करून चीन आता ती चढ्या दराने विकत असल्याचा आरोप व्हॉइट हाउसच्या उच्च अधिकाऱ्याने केला.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

व्यापार आणि उत्पादन विभागाचे संचालक पीटर नवारो यांनी याबाबतचा पुरावा असल्याचा दावाही केला. फॉक्स बिझनेस न्यूजला त्यांनी सांगितले की, एकीकडे चीन विषाणू लपवित असतानाच दुसरीकडे जगभरातील पीपीइ किट्सची खरेदी करून टंचाई निर्माण करीत होता. चीनच्या साठेबाजमुळेच भारत, ब्राझील तसेच युरोपातील अनेक देशांना याचा तुटवडा जाणवतो आहे. चीन सरकारच्या थेट अबकारी कर संघटनेकडूनच मला पुरावा मिळाला आहे. त्यावरून चीनने नुसते मास्कच दोन अब्जाहून जास्त घेतले. गॉगल आणि ग्लोव्हजच्या खरेदीचे प्रमाणही वाढविण्यात आले. आता हेच साहित्य अत्यंत अवाजवी दराने विकले जात आहे. अशा प्रकारांची चौकशी होण्याची गरज आहे. प्रत्यक्षात चीन ज्या आंतरराष्ट्रीय संबंधांबाबत अपेक्षेचा दावा करतो, त्यादृष्टिने हे योग्य नाही. याचा अमेरिकेला झालेला एक मोठा फायदा म्हणजे आम्हाला औषधे, वैद्यकीय वस्तू आणि साहित्याचे उत्पादन आपल्या देशात करावे लागले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: White House official accuses China again