Coronavirus : खरा विनाश अजून बाकी आहे : जागतिक आरोग्य संघटना

वृत्तसंस्था
Tuesday, 21 April 2020

कोरोनाचा प्रादुर्भाव जगभरात पसरत असताना जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी खरा विनाश तर अजून बाकी असल्याचे सांगितले आहे. त्यांनी एकप्रकारे अजून मोठा धोका समोर असल्याचेच सांगितले आहे.

नवी दिल्ली : कोरोनाचा प्रादुर्भाव जगभरात पसरत असताना जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी खरा विनाश तर अजून बाकी असल्याचे सांगितले आहे. त्यांनी एकप्रकारे अजून मोठा धोका समोर असल्याचेच सांगितले आहे. कोरोनाचा प्रभाव अद्यापही कमी झाला नसताना अनेक देश निर्बंध शिथील करत असल्याच्या पार्श्वभुमीवर जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस ऍधानॉम घेबरेयेसस यांनी हा इशारा दिला.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जागतिक आरोग्य संघटनेने अफ्रिकेतून आजार पसरण्यास सुरुवात होईल असा दावा केला आहे. अफ्रिकेतील आरोग्य सेवा विकसित नसल्याने तेथून आजार पसरेल असं जागतिक आरोग्य संघटनेचं म्हणणं आहे.  आमच्यावर विश्वास ठेवा, खरा विनाश अजून बाकी आहे, असं टेड्रोस यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. हे संकट रोखायला हवं. हा एक व्हायरस आहे जो अद्यापही अनेक लोकांना समजलेला नाही, असंही त्यांनी यावेळी सांगितले.

आशिया आणि युरोपातील काही देशांनी कोरोनाचे रुग्ण आणि मृतांची संख्या कमी होऊ लागल्यानंतर लॉकडाउनचे नियम शिथील केले आहेत. यामुळे शाळा, उद्योग सुरु करण्यात आले असून सार्वजनिक कार्यक्रमांवरील बंदी उठवण्यात आली आहे. तसंच क्वारंटाइन होण्याचं प्रमाणही कमी झालं आहे. याच पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने हा इशारा दिला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: WHO Director Generals opening remarks at the media briefing on COVID-19