Coronavirus : कोरोनाव्हायरस नेमका आला कुठून? जागतिक आरोग्य संघटनेने दिले उत्तर

वृत्तसंस्था
Wednesday, 22 April 2020

नवी दिल्ली : जगभरात कोरोनाव्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असताना हा व्हायरस नेमका आाला कुठुन असा प्रश्न प्रत्येकाला पडला आहे. सुरुवातीला साप, त्यानंतर वटवाघूळ आणि आता लॅबमधूनच हा व्हायरस पसरवण्यात आला असं म्हटलं जातं आहे.  मात्र, हा व्हायरस लॅबमधून नव्हे तर एखादा प्राणी विशेषत: वटवाघळामार्फत पसरला असावा, असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आरोग्य संघटनेच्या वेस्टर्न पॅसिफिकचे क्षेत्रीय संचालक तकेशी केसाई यांनी सांगितलं की, कोरोनाव्हायरस नेमका कुणामार्फत पसरला, हे ठोस सांगता येईल अशी माहिती सध्या तरी मिळणं शक्य नाही. मात्र, हा प्राण्यामार्फत माणसांमध्ये आल्याची शक्यता आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं लॅबमधून कोरोनाव्हायरस पसरला असण्याची शक्यता नाकारली आहे. सध्या जे पुरावे उपलब्ध आहेत, त्यानुसार कोरोनाव्हायरस हा प्राण्यापासून पसरला असं दिसून येतं असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे.

Coronavirus : कोरोनावरुन केंद्र आणि प. बंगाल सरकारमध्ये पुन्हा जुंपली

दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेनं याआधी वटवाघळापासून कोरोनाव्हायरस पसरल्याची शक्यता व्यक्त केली होती. मानवी शरीरातील कोरोनाव्हायरसची जेनेटिक चाचणी केल्यानंतर ते वटवाघळांमधील कोरोनाव्हायरसशी मिळतेजुळते असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे सुरुवातीला हा व्हायरस प्राण्यांमध्ये आणि त्यानंतर माणसांमध्ये पसरला असावा, असं म्हणू शकतो, असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं होतं. जागतिक आरोग्य संघटनेनं असंही म्हटलं होतं की, सीफूड मार्केटमध्ये सर्वात आधी एका व्यक्तीला कोरोनाव्हायरसची लागण झाली आणि त्यानंतर हा व्हायरस इतर माणसांमध्ये पसरला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: WHO says coronavirus came from an animal and was not made in a lab

Tags
टॉपिकस
Topic Tags: