Coronavirus : जागतिक बँक भारताच्या मदतीला; सर्वाधिक निधीची तरतूद

वृत्तसंस्था
Friday, 3 April 2020

वैद्यकीय तपासणीसाठी होईल मदत

- पाकिस्तानला २० कोटी डॉलर

वॉशिंग्टन : कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. या व्हायरसमुळे देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व व्यवहार ठप्प आहेत. या सर्व बाबींची कल्पना लक्षात जागतिक बँक भारताच्या मदतीला पुढे आली आहे. त्यानुसार, मोठी आर्थिक मदत मिळणार आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भारताला जागतिक बँकेकडून एक अब्ज डॉलरच्या आपत्कालीन अर्थ सहाय्यता निधीसाठी मंजूरी दिली आहे. जागतिक बँकेच्या सहाय्यता योजनेतून १.९ अब्ज डॉलरच्या पहिल्या टप्प्यात २५ देशांची मदत केली जाणार आहे. तसेच, ४० हून अधिक देशांमध्ये नवीन उपक्रम वेगाने आखले जात आहेत. जागतिक बँकेकडून आपत्कालीन अर्थ सहाय्यता निधीतून सर्वाधिक निधी भारताला दिला जाणार आहे. जागतिक बँकेकडून एक अब्ज डॉलरची मदत दिली जाणार आहे, यासाठी मंजूरीही देण्यात आली आहे.

The World Bank Groupजागतिक बँकेच्या कार्यकारी संचालक मंडळाने जगभरातील विकसनशील देशांसाठी आपत्कालीन सहाय्यता योजनेच्या पहिल्या टप्प्यात मंजूरी दिली. 

वैद्यकीय तपासणीसाठी होईल मदत

भारतात एक अब्ज डॉलरच्या आपत्कालीन अर्थ सहाय्यता निधी दिला जाणार आहे. या निधीतून कोरोनावर मात करण्यासाठी कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेणे, वैद्यकीय तपासणी प्रयोगशाळा निर्मितीसाठी याचा फायदा होईल, असे जागतिक बँकेने सांगितले. 

पाकिस्तानला २० कोटी डॉलर

भारतासह पाकिस्तान, अफगाणिस्तान, मालदीव, श्रीलंका या देशांनाही जागतिक बँकेने मदत केली आहे. यामध्ये पाकिस्तानला २० कोटी डॉलरची मदत केली जाणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: World Bank Approves 1 Billion Dollar Emergency Funds For India To Fight Coronavirus