कोल्हापुकरांचा दिवसभर सन्नाटा अन् सायंकाळी घंटा वाजवून कृतज्ञता...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 मार्च 2020

कोरोना प्रतिबंधासाठी कार्यरत सेवाभाव जपणाऱ्या घटकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. सकाळी सातपासून प्रत्येक घराने जणु स्वतःला कोंडून घेतले होते.

कोल्हापूर - दिवसभर सन्नाटा अनुभवलेल्या शहराने आज सायंकाळी पाच वाजता उभामारुती चौकाच्या मंदिरातील तरुणांनी घंटा वाजवली आणि क्षणात तिन्ही बाजूच्या गल्यांतील नागरिक रस्त्यावर आले. गॅलरीत उभा राहिले. पहतापाहता 

पराती, ताट, घंटा, टाळ्या, टिमक्‍या वाजवत कोल्हापुरातील शिवाजी पेठेत 

कोरोना प्रतिबंधासाठी कार्यरत सेवाभाव जपणाऱ्या घटकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. सकाळी सातपासून प्रत्येक घराने जणु स्वतःला कोंडून घेतले होते. मात्र, घरात गप्पांचे फड रंगले आणि स्नेहभोजनाचा फक्कड बेतही झाला. तरीही तब्बल दहा तास कोल्हापूरकरांसाठी घरात कोंडून घेणे म्हणजे एक मोठी शिक्षाच. त्यामुळे पाऊणे पाच वाजताच त्यांची तयारी सुरू झाली. पाचच्या ठोक्‍याला फायर स्टेशनमधून सायरन वाजले आणि पाच मिनिटे टाळ्या, थाळ्याच नव्हे तर पराती आणि होळीच्या टिमक्‍यांनीही एकच ताल धरला.

वाचा - जनता कर्फ्यू मुळे आपल्या कुटुंब व्यवस्थेला होणार हा फायदा... जाणुन घ्या...  

 पापाची तिकटी परिसरात तर ब्रास बॅंडच्या सुरांनी माहौल एका क्षणात बदलून गेला. हा परिसर म्हणजे बॅंडवाल्यांच्या कार्यालयांचा परिसर. साहजिकच त्यांनी बॅंडच्या माध्यमातून कृतज्ञता व्यक्त केली. उभा मारूती चौक, सोन्या मारूती चौक, खंडोबा मंदिर परिसरात तर मंदिरातील घंटांचा नाद इतका घुमला की साऱ्या गल्लीने जणु महाआरतीच साजरी केली. सर्वांनी बाहेर येवून एकाच वेळी सामूहिकपणे टाळ्यांचा कडकडाट केला. अनेक ठिकाणी शंखनाद, तुतारी आणि डमरूचाही ताल धरला गेला. अंबाबाई मंदिर दर्शनासाठी बंद आहे. मात्र, मंदिराच्या गेटवरही घंटानाद करण्यात आला. 
खर तर ही पाच मिनिटे होती ती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी. मात्र, कोल्हापूर असतील त्या कपड्यावर तसेच बाहेर आले. अपार्टमेंटच्या टेरेसवर, बाल्कनीत आणि खिडक्‍यांत उभारूनही सारी कुटुंबं त्यात सहभागी झाली. मात्र, या साऱ्या मंडळींचा उत्साह इतका प्रचंड होता की, परिसरातील पोलिसांनी दहा मिनिटांनी लगेचच साऱ्यांना पुन्हा घरात जाण्याच्या सूचना केल्या आणि पुन्हा शहरात एकच सन्नाटा पसरला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: in kolhapur expressed his gratitude for the factors that contribute to the corrosion prevention work

टॅग्स
टॉपिकस