Coronavirus : कोरोना संकटाचा सर्वात मोठा फटका या क्षेत्राला बसला

Property-Field
Property-Field

मुंबई - लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था ठप्प झाल्याने त्याचा सर्वात मोठा फटका मालमत्ता क्षेत्राला बसला आहे. यापूर्वी मालमत्ता क्षेत्रावर अनेक संकटे आली; त्यातून वेळोवेळी मार्ग निघाला. मात्र कोरोनामुळे अभुतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. देशातील आठ महानगरांतील साडेसहा लाख तयार घरे अद्यापही विक्रीविना पडून आहेत. देशातील 8 महानगरांत 15 लाख घरांचे बांधकाम प्रकल्प सुरू झालेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करणाऱ्या या क्षेत्राला सरकारने आर्थिक मदत, सवलती दिल्या, तर हे क्षेत्र पुन्हा भरारी घेईल. मालमत्ता क्षेत्रातील `99 एकर` या अग्रेसर संकेतस्थळाने या संदर्भातील एक सर्वेक्षण केले. त्यातील काही महत्त्वाच्या निष्कर्षांवर एक नजर..

विविध घटकांवर झालेले परिणाम
ग्राहक

लॉकडाऊनमुळे घराचा ताबा मिळण्यास उशीर
थेट वाटाघाटी करण्यास अडचणी
अर्थव्यवस्था मंदावल्यामुळे पैसे फेडण्याच्या क्षमतेत घट
फेस्टिवल ऑफरही पुढे ढकलल्या

विक्री
बांधकामाच्या साईटवर जाण्यावर निर्बंध; मालमत्ता खरेदी करण्यात घट
घर खरेदी करताना ग्राहकांना कराव्या लागणार जास्त वाटाघाटी
विविध सवलती, व्याजदर कमी केल्याचा फायदा घरमालकांना मिळणार

विकासक
चीनमधून कच्च्या मालाची आयात कमी; लॉकडाऊनमुळे प्रकल्प थंडावले
खरेदीमध्ये घट झाल्यास विकासकांची आर्थिक स्थिती बिकट
नवे प्रकल्प आणि फेस्टिवल ऑफर 6 ते 9 महिन्यांसाठी पुढे ढकलावे लागणार
प्रकल्प पूर्ण होण्याच्या कालावधीत वाढ करण्याची मागणी

मालमत्ता एजंट
लॉकडाऊनचा थेट व्यवसायावर परिणाम
नेटवर्किंगसाठी डिजिटल प्लॅटफॉर्मची आवश्यकता

पुरवठा जास्त, मागणी कमी
आठ महानगरांमध्ये जवळपास 6 लाख 24 लाख घरे विक्रीविना पडून आहेत. घरे विकण्यासाठी फेस्टिवल काळही निघून गेला आहे. तर 15 लाख घरांचे प्रकल्प पुढे ढकलावे लागतील.

लिजवर मालमत्ता खरेदीत वाढ
सहा महानगरामध्ये कार्यालयांसाठी जागा लिजवर खरेदी घेणाऱ्यांच्या संख्येत 27 टक्के वाढ झाली आहे. बंगळुरु, मुंबई, हैदराबाद या महानगरात 75 टक्के कार्यालये लिजवर आहेत.

किमती कोसळणार
सध्यातरी प्रमुख शहरामध्ये घराच्या किमती कमी झाल्या नाही; मात्र कोरोना संकटामुळे ग्राहकांची घर खरेदीची क्षमता कमी होणार असल्यामुळे स्वाभाविक घराच्या किमंती कमी कराव्या लागणार आहे.

भाडेतत्त्वावर घरांना मागणी
मुंबई, पुणे, हैद्राबाद, बंगळुरु या शहरात भाडेतत्वावरील घरांच्या मागणीत 3 ते 4 टक्के वाढ झाली आहे. मुंबई, दिल्लीसह इतर महानगरामध्ये  मोठ्या प्रमाणात घरे तयार आहे. कोरोना संकटामुळे भाडेतत्वावर मालमत्ता घेणाऱ्यांच्या संख्येत वाढ होणार आहे.

परवडणाऱ्या घरांची मागणी कायम
जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात घरांना मागणी होती. मार्चच्या दोन आठवड्यांत आठ महानगरांमध्ये घरांसाठी अनेकवेळा चौकशी येत होत्या. मात्र कोरोनामुळे साईट व्हिजिटिंग ठप्प झाल्याने प्रकल्प पूर्ण होण्यास वेळ लागणार आहे. मात्र, परवडणाऱ्या घरांची मागणी कायम राहण्याचे संकेत आहेत.

अनेक प्रकल्प लांबणीवर
मार्चपर्यंत तयार घराची मागणी कायम होती; मात्र लॉकडाऊनच्या काळात उत्तर भारतामध्ये घरांसाठी चौकशीमध्ये 20 टक्के, तर दक्षिण भारतात घरांच्या चौकशीमध्ये 7 ते 8 टक्क्यांनी कमी झाल्यात. या काळात सर्व गृहप्रकल्पाचे काम थांबले आहे. त्यामुळे हे क्षेत्र संकटात आले आहे. देशातील 15 लाख घरांच बांधकाम सुरु होते. त्यापैकी एकट्या मुंबईत 57 टक्के म्हणजे 8 लाख 90 हजार घरे आहेत. तर दिल्लीमध्ये 4 लाख 25 हजार घरांचे बांधकाम सुरु आहे. हे सर्व प्रकल्प आता लांबणीवर पडले आहेत.

परवडणाऱ्या घरांची मागणी जास्त
40 लाख रुपये किंमतीच्या आत असलेली परवडणारी  6 लाख 24 हजार घरेसुद्धा अजून खपलेली नाही. 40 लाख ते 1 कोटी रुपये किमंतीची घरे मागणीच्या तुलनेत जास्त उपलब्ध आहेत. तर आलीशान घरे मागणीपेक्षा अधिक उपलब्ध आहेत. परवडणाऱ्या घऱांची मागणी जास्त आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com