मुंबई, पुण्यातील संसर्ग आव्हानात्मक; केंद्राची राज्य सरकारला सूचना 

मृणालिनी नानिवडेकर / सकाळ न्यूज नेटवर्क 
Friday, 10 April 2020

राज्यात सर्वाधिक गुंतवणूक खेचणाऱ्या महामुंबई (एमएमआरडीए) क्षेत्रातच सर्वाधिक रूग्ण आहेत.

मुंबई - मुंबई, पुणे परिसरातील आंतरराष्ट्रीय विमानतळे, मुंबईतील लोकसंख्येची घनता यामुळे कोरोनाचे संकट या परिसरात आटोक्‍यात आणणे राज्य सरकारसमोरचे सर्वांत मोठे आव्हान ठरणार आहे. तसे केंद्र सरकारने राज्याला कळविले आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज्यात सर्वाधिक गुंतवणूक खेचणाऱ्या महामुंबई (एमएमआरडीए) क्षेत्रातच सर्वाधिक रूग्ण आहेत. आर्थिक घडी बसविण्यासाठी जे भौगोलिक भाग आधार ठरतील अशाच ठिकाणी संसर्ग वाढत आहे. 

महामुंबई, पुणे परिसर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची ‘शोकेस' मानली जाते, त्यामुळे हा विषय केवळ स्थानिक नव्हे तर देशाच्या चिंतेचा ठरला असल्याचे एका जबाबदार अधिकाऱ्याने नमूद केले. महाराष्ट्रातील ७३ टक्‍के प्रादुर्भाव मुंबई प्राधिकरण क्षेत्रात आहे. पुणे येथे १५ टक्‍के रूग्ण आहेत. पश्‍चिम महाराष्ट्रातील ६ टक्‍के रुग्ण ‘मरकज'शी संबंधित असून आता सांगली जिल्ह्यात संसर्गावर नियंत्रण ठेवण्यात आले आहे. महाराष्ट्रातील संसर्ग अद्याप नियंत्रणात का आलेला नाही असा प्रश्‍न केंद्रीय आरोग्य खात्याला तसेच इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्चला पडला असल्याचे एका माहितगाराने सांगितले. केंद्र सरकारने या संदर्भात राज्यांशी सतत संपर्क ठेवला आहे. 

अद्याप गुणाकार नाही 
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या कार्यालयाने शक्‍य ते सर्व प्रयत्न केले जात आहेत, असे केंद्राला कळवल्याचे समजते. महाराष्ट्रातील कोरोना गुणाकार पद्धतीने वाढलला नाही, जगातील अन्य देशांपेक्षा महाराष्ट्रात हे प्रमाण कमी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. दुर्धर आजाराने ग्रासलेल्या रूग्णांची संख्या आणि मृतांमध्ये मोठी आहे असेही त्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona crisis in Mumbai and Pune before the government