Coronavirus : सायबर गुन्ह्यासंदर्भात कोणाचीही गय नाही; १३२ गुन्हे दाखल

Coronavirus 132 cases filed under cyber crime
Coronavirus 132 cases filed under cyber crime

मुंबई : महाराष्ट्र सायबरची लॉकडाऊनच्या काळात प्रभावी कारवाई सुरू असून कोणाचीही गय केली जाणार नाही संबंधितांविरुद्ध कडक कारवाई केली जाईल असे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी सांगतिले असून आतापर्यंत एकूण १३२ गुन्हे दाखल झाले आहेत.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये, काही गुन्हेगार व समाजकंटक या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्र सायबर, या गुन्हेगारांना व समाजकंटकांना पकडण्यासाठी व त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कारवाई करण्यासाठी सर्व जिल्हा पोलिस प्रशासनाबरोबर समन्वय साधून काम करत आहे. महाराष्ट्र सायबर या करिता टिकटॉक, फेसबुक, ट्विटर व अन्य सोशल मिडीयावर चालणाऱ्या गैरप्रकारांवर बारीक लक्ष ठेवून आहे. 

७ एप्रिल पर्यंतचे गुन्हे
राज्यातील विविध पोलिस स्टेशनमध्ये नविन १९ असे ७ एप्रिल २०२० पर्यंत एकूण १३२ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामध्ये बीड १६, कोल्हापूर १३, पुणे ग्रामीण ११, मुंबई ९, जालना ८, सातारा ७, जळगाव ७, नाशिक ग्रामीण ६, नागपूर शहर ४, नाशिक शहर ५, ठाणे शहर ४, नांदेड ४, गोंदिया ३, भंडारा ३, रत्नागिरी ३, परभणी २, अमरावती २, नंदुरबार २, लातूर १, उस्मानाबाद १, हिंगोली १ यांचा समावेश आहे.

Coronavirus: ही व्यक्ती करणार तब्बल साडेसात हजार कोटी रुपयांची मदत

या सर्व गुन्ह्यांचे महाराष्ट्र सायबरने जेव्हा विश्लेषण केले तेव्हा असे निदर्शनास आले की आक्षेपार्ह व्हाट्सअँप मेसेजेस फॉरवर्ड केल्या प्रकरणी ७९ गुन्हे दाखल झाले आहेत, तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी २४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. टिकटॉक व्हिडिओ शेअर प्रकरणी ३ गुन्हे दाखल झाले आहेत व ट्विटरद्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी ३ गुन्हे दाखल झाले आहेत .तर अन्य सोशल मीडियाचा (ऑडिओ क्लिप्स, यूट्यूब) गैरवापर केल्या प्रकरणी २३ गुन्हे दाखल झाले आहेत व  त्यामध्ये आतापर्यंत ३५ आरोपींना अटक केली आहे.

Coronavirus : जगभरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा १५लाखांवर तर, मृत्यूंचा आकडा...

राज्यात काल  विविध  जिल्ह्यात कोल्हापूर, बीड, जालना, हिंगोली, जळगाव, उस्मानाबाद या सर्व ठिकाणी नवीन गुन्ह्यांची नोंद झाली. या गुन्ह्यांमध्ये आरोपींनी आपल्या फेसबुक/व्हाट्सअॅप  व अन्य सोशल मीडियाचा वापर करून कोरोना महामारीला धार्मिक रंग देऊन आक्षेपार्ह पोस्ट टाकल्या, ज्यामुळे त्या परिसरात अशांतता निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ शकतो.

सतर्कता बाळगावी
सध्या या लॉकडाऊनच्या काळात काही नवीन प्रकारच्या सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. कोणत्या ही वस्तूंची ऑनलाईन ऑर्डर करताना, बऱ्याचदा एका खोट्या संकेत स्थळावर तुम्हाला डायरेक्ट केले जाते व मोबाईल नंबर विचारला जातो आणि मोबाईल नंबर एंटर केल्यावर एक कॉल येतो व त्या संकेतस्थळावरील एक फॉर्म भरायला सांगितलं जातो ज्यामध्ये बँक अकॉउंटचे सर्व डिटेल्स, क्रेडिट/डेबिट कार्डची सर्व माहिती विचारली जाते. त्यांनतर, फोनवरील व्यक्ती आपल्या मोबाइलवर येणारा ओटीपी कन्फर्म करायला सांगते आणि कॉल डिस्कनेक्ट होतो व काही वेळात ग्राहकाला आपल्या बँक खात्यातून रक्कम डेबिट झाल्याचा मेसेज येतो.  सर्व नागरिकांनी अशी ऑनलाईन खरेदी करताना सतर्कता बाळगून आपले कोणतेही बँक डिटेल्स शेअर करू नयेत व असे काही घडल्यास आपल्या बँकेच्या हेल्पलाईनवर बँकेला तात्काळ कळवून आपल्या नजीकच्या पोलिस स्टेशनमध्ये तक्रार करावी, तसेच सदर गुन्ह्याची माहिती www.cybercrime.gov.in या संकेत स्थळावर कळवावी.

महाराष्ट्र सायबरनेही सर्व नागरिकांना सूचना केल्या आहेत की, कोरोना व्हायरस संदर्भात अफवा पसरविणे, खोटी/चुकीची माहिती सोशल मीडिया वर प्रसारित करणे अशा प्रकारचे गुन्हेगारी कृत्य केल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल व त्यामध्ये कोणाचीही गय केली जाणार नाही. त्यामुळे सर्व नागरिकांनी अशा प्रकारच्या गुन्हेगारी कृत्यापासून अलिप्त राहावे .

महाराष्ट्र सायबरने सर्व नागिरकांना आवाहन केले आहे की, कृपया कोणीही अफवा व खोट्या बातम्या समाज माध्यमांवर पसरवू नयेत, व त्यांच्यावर विश्वास ठेवू नये. तसेच काही मदत लागल्यास जवळच्या पोलीस स्टेशनला संपर्क साधावा. केंद्र सरकार व राज्य सरकार वेळोवेळी ज्या नियमावली प्रसारित करत असतात त्याचे पालन करावे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com