कोरोनावरूनही राजकारण : पश्चिम महाराष्ट्रातले दोन पाटील आणि 'ट्विट युद्ध'

टीम ई-सकाळ
Sunday, 12 April 2020

महाराष्ट्रात विरोधीपपक्ष नेते देवेंद्र फडणवीस सरकारच्या उपाय योजनांकडे बोट करत आहेत. सरकारला कठोर पावले उचलण्याचे सल्ले देत आहेत.

पुणे Coronavirus : सध्या महाराष्ट्रात कोरोनानं अक्षरशः थैमान घालायला सुरुवात केलीय. देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात आहे. अशा वेळी कोरोना एका बाजुला आणि त्यावरून सुरू असलेलं राजकारण एका बाजुला असं काहीसं चित्र सध्या महाराष्ट्रात दिसत आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

आरोप-प्रत्यारोप सुरूच
महाराष्ट्रात विरोधीपपक्ष नेते देवेंद्र फडणवीस सरकारच्या उपाय योजनांकडे बोट करत आहेत. सरकारला कठोर पावले उचलण्याचे सल्ले देत आहेत. त्याचवेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारवर अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केलीय. अमेरिकेच्या दबावापुढे मोदी सरकार झुकले, अशा आशयाची टीका त्यांनी केलीय. असं असताना पश्चिम महाराष्ट्रात दोन पाटलांमधील आरोप-प्रत्यारोप सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राज्याचे पाटबंधारे आणि जलंधारण मंत्री जयंत पाटील यांच्यात हे वाक् युद्ध सुरू झालंय. त्याची सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. 

आणखी वाचा - उद्धवजी लोकांचे जीव वाचवा आणि जगण्याची साधनंही

आणखी वाचा - भाडे नाही तर घर सोडा, विद्यार्थ्यांवर मालकांची तंबी

काय म्हणाले जयंत पाटील?
भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी, सरकारला जाब विचारताना मंत्री जयंत पाटील यांना प्रश्न उपस्थित केला होता. शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस कुठं आहे. भाजपचे कार्यकर्ते कोरोनाशी लढा देत आहेत. राज्यात 5 हजार बाटल्या रक्त गोळा करण्यात आले आहे. रक्तपेढ्यांची सध्या क्षमता नसल्यामुळं रक्तदात्यांची यादी करण्यात आलीय. भाजपच्या कार्यकर्त्यांकडून कम्युनिटी किचन्सच्या माध्यमातून 43 लाख लोकांना जेवण किंवा शिधा पुरवला जात आहे, अशी महिती देत असताना सरकारचे घटपक्ष कुठं आहेत, असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला. त्याला मंत्री जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलंय. 

दादा, कोरोना आजाराचा साठीच्या वरील लोकांना अधिक धोका उद्भवतो. त्यामुळे, आपण जास्त बाहेर फिरू नका. स्वतःची काळजी घ्या. काही कमी जास्त लागल तर कळवा. मी आहेच ना आपल्या मदतीला, असा टोला जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावलाय. चंद्रकांतदादा, सगळा देश आणि महाराष्ट्र सध्या कोरोनाच्या विरोधात लढाई लढतो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लॉकडाऊन संदर्भातील धोरणे सर्वांशी चर्चा करून ठरवत आहेत. सर्व लोक त्यांना सहकार्य करत आहेत. अशा वेळी तुम्हाला राजकारण सुचते, याचे मला कौतुक वाटते, असा चिमटाही जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावलाय. सध्या जयंत पाटील यांच्या ट्विटचे स्क्रीन शॉट्स इतर सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत.

No photo description available.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus bjp leader chandrakant patil minister jayant patil twitter reaction