Coronavirus : महाराष्ट्रातील एकूण आकडा १८९५; आज कोठे वाढले किती रुग्ण?

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 12 April 2020

महाराष्ट्रात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या १८९५ झाली आहे. यामध्ये बृहन्मुंबई ११३,  रायगड ०१, अमरावती ०१,  पुणे ०४, मीरा-भाईंदर ०७, नवी मुंबई ०२,  ठाणे परिसर ०२,  भिवंडी ०१,  वसई विरार ०२, पिंपरी चिंचवड ०१ असे १३४ नवीन कोरोना बाधित रुग्ण दाखल झाले असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

मुंबई : महाराष्टारीत कोरोना रुग्णांच्या संख्येत कोणतीही घट होताना दिसत नाही. उलट यात रोज भरच पडू लागली आहे. आज (ता. १२) रविवारी दुपारपर्यंत महाराष्ट्रात १३४ नव्या करोना रुग्णांची भर पडली असून त्यापैकी एकट्या मुंबईत ११३ रुग्ण आहेत. राज्यात एकूण करोना रुग्णांची संख्या आता १८९५ वर गेली असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करुन दिली आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महाराष्ट्रात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या १८९५ झाली आहे. यामध्ये बृहन्मुंबई ११३,  रायगड ०१, अमरावती ०१,  पुणे ०४, मीरा-भाईंदर ०७, नवी मुंबई ०२,  ठाणे परिसर ०२,  भिवंडी ०१,  वसई विरार ०२, पिंपरी चिंचवड ०१ असे १३४ नवीन कोरोना बाधित रुग्ण दाखल झाले असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

पुण्यात दोन महिलांचा मृत्यू, पुण्यातील मृतांचा एकूण आकडा ३१
आज सकाळपासून पुण्यात करोनाने दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील संगमवाडी परिसरातील एका ५८ वर्षीय महिलेसह सोमवार पेठेतील एका ५६ वर्षीय महिलेचा करोनामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. या दोन्ही महिलांना अन्य आजारांनी देखील ग्रासले होते,नअसे देखील सांगण्यात आले आहे. ससून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. पुण्यात आतापर्यंत करोनामुळे ३१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्या ३१ रुग्णांपैकी आज २ जणांचा मृत्यू झाला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronavirus : Maharashtra reports 134 new COVID-19 cases today