Coronavirus : राज्यातील एकूण रुग्ण संख्या ४९०; एकूण ५० रुग्ण बरे

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 4 April 2020

७३८ जणांचे विलगीकरणात
निजामुद्दीन येथील बंगलेवाली मशीदीत मार्च महिन्यात झालेल्या धार्मिक कार्यक्रमात राज्यातील ज्या नागरिकांनी भाग घेतला होता त्यांचा सर्व जिल्हा आणि महानगरपालिका स्तरावर कसून शोध घेण्यात येत आहे. आतापर्यंत एक हजार २२५ व्यक्तींच्या यादीपैकी एक हजार ३३ व्यक्तींशी संपर्क झाला आहे. त्यापैकी ७३८ जणांना विलगीकरण कक्षात भरती करण्यात आले आहे.

पुणे - राज्यात आज ६७ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. त्यात ४३ रुग्ण मुंबईतील असून १० रुग्ण मुंबई परिसरातील आहेत. बाधित रुग्णांमध्ये पुण्यातील ९ तर नगर जिल्ह्यातील ३  रुग्णांचा समावेश आहे. याशिवाय वाशिम आणि रत्नागिरी येथे प्रत्येकी एका रुग्णांची नोंद झालेली आहे. यामुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ४९० झाली आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज्यात गेल्या चोवीस तासांमध्ये चार जणांचा झाला आहे. मुंबईत तिघांचा आणि ठाण्यात एकाचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मरण पावलेल्यांची संख्या आता २६ झाली आहे. राज्यात ५९५ जण विविध रुग्णालयात भरती झाले आहेत.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १२ हजार ८५८ नमुन्यांपैकी ११,९६८ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरता निगेटिव्ह आले आहेत. तर ४९० जण पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत ५० रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus patients in the state is 499 and release 50 patients