दिलासादायक! महाराष्ट्रातील कोरोनाची रुग्णवाढ घटली; संपूर्ण परिस्थितीची माहिती एका क्लिकवर...

corona, covid 19
corona, covid 19

आतापर्यंत देशात कोरोनाचा सर्वात जास्त फटका  महाराष्ट्राला बसला आहे. देशात महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. मागील आठवड्यातील महाराष्ट्रातील कोरोनाची स्थिती पाहिली असता, दिवसाला 10 हजारांच्यावर रुगण वाढत होते. सकारात्मक बाब म्हणजे मागील 24 तासांत महाराष्ट्रात कोरोनाचे 8,493 नवीन रुग्ण आढळले आहेत. यापुर्वीच्या 13 दिवसांचा विचार केला असता, ही एका दिवसातील सर्वात कमी वाढ आहे. 

दुसरी सकारात्मक बाब म्हणजे मागील 24 तासांत मृत्यू दरातही घट झाली असून 228 रुग्ण दगावल्याची नोंद झाली आहे. मागील 21 दिवसातील हा सर्वात कमी आकडा आहे. तसेच एका दिवसात 11,391 रुग्णांना घरी सोडण्यात आले असून  डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्याही 4,28,514 वर पोहोचली आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात 6,04,358 लोकांना कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी झाली होती. सध्या राज्यात कोरोनाचे 1,55,268 (25.6) ॲक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहे. 

ICMR च्या माहितीनुसार देशात आतापर्यंत 3 कोटींच्या वर चाचण्या घेण्यात आल्या आहेत. मागील 24 तासांत 8.97 लाख कोरोना चाचण्या पार पडल्या आहेत. तसेच जगाचा विचार केला तर कोरोना रुग्णांच्या आकडेवारीत भारत तिसऱ्या स्थानी आहे. जगभरातील झालेल्या मृतांपैकी भारतात आतापर्यंत 16.65 % मृत्यु झाले आहेत. भारतात सरासरी रोज 900 लोकांचा मृत्यू होत आहे. 

जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण  सक्रीय रुग्ण (ॲक्टिव्ह केसेस ) मृत्यू
मुंबई  129479 104301 17404 7173
ठाणे 114886 97726 19818 3351
पालघर 21400 14580 6318 502
रायगड 23627 18115 4922 588
रत्नागिरी 2870 1608 1159 103
सिंधुदुर्ग 637 445 180 12
पुणे 132481 89810 39424 3247
सातारा 7591 4588 2767 235
सांगली 6718 3837 2664 217
कोल्हापूर 14241 7153 6706 382
सोलापूर 14553 9295 4626 633
नाशिक 27151 16593 9882 676
अहमद नगर 13136 9672 3322 142
जळगाव 18299 12415 5192 692
नंदुरबार 1184 794 337 53
धुळे 5268 3607 1502 157
औरंगाबाद 18708 12226 5904 578
जालना 3286 1837 1335 114
बीड 2709 927 1721 61
लातूर 5351 2586 2560 205
परभणी 1520 559 909 52
हिंगोली 1023 706 295 22
नांदेड  4002 1763 2098 141
उस्मानाबाद 3711 1855 1758 98
अमरावती 3635 2388 1150 97
अकोला 3277 2667 470 139
वाशीम 1249 810 418 21
बुलढाणा 2426 1494 846 66
यवतमाळ 2093 1316 727 50
नागपूर 13995 6670 6959 365
वर्धा 389 234 134 10
भंडारा  533 346 128 5
गोंदिया 796 541 245 10
चंद्रपूर 1065 622 436 7
गडचिरोली 529 428 100 1
         

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com