‘पीएम-केअर्स’साठीचा निधी महाराष्ट्र बॅंकेकडे करा जमा

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 8 April 2020

इच्छुक नागरिक आणि संस्था पीएम केअर्स फंड यामध्ये देणगी देण्यासाठी खालील तपशीलांचा वापर करून देणगी देऊ शकतात 

 • खात्याचे नाव : पीएम केअर्स
 • खाते क्रमांक : ६०३५५३५८९६४
 • आयएफएससी : MAHB०००११६०
 • बॅंकेचे नाव : बॅंक ऑफ महाराष्ट्र
 • शाखेचे नाव : युपीएससी शाखा
 • पत्ता : धोलपूर हाऊस, शाहजहान मार्ग, नवी दिल्ली - ११००६९

पुणे - बॅंक ऑफ महाराष्ट्रची पीएम केअर्स फंडामध्ये देणग्या गोळा करण्यासाठी नेमणूक झाली आहे. कोरोना विषाणू संक्रमणाच्या प्रादुर्भावास अटकाव करण्यासाठी २८ मार्च २०२० रोजी प्राईम मिनिस्टर्स सिटीझन असिस्टंस अँड रिलीफ इन इमर्जन्सी सिच्युएशन फंडचा प्रारंभ झाला आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

हा निधी आयकर कायद्यातील कलम ८० जी अंतर्गत १०० टक्के प्राप्तिकर सूट मिळण्यास पात्र आहे. पीएम केअर्स फंड या नावे काढलेले चेक्‍स, डिमांड डाफ्ट्‌स, आरटीजीएस/एनईएफटी, आयएमपीएसद्वारे पाठवलेले पैसे किंवा रक्कम दिली जावू शकते. याशिवाय बॅंक ऑफ महाराष्ट्राच्या नियुक्त बचत खात्यात इलेक्‍ट्रॉनिक क्‍लिअरिंग सिस्टमद्वारे (ईसीएस) थेट अंशदान देखील पाठवता येते.

इच्छुक नागरिक आणि संस्था पीएम केअर्स फंड यामध्ये देणगी देण्यासाठी खालील तपशीलांचा वापर करून देणगी देऊ शकतात 

 • खात्याचे नाव : पीएम केअर्स
 • खाते क्रमांक : ६०३५५३५८९६४
 • आयएफएससी : MAHB०००११६०
 • बॅंकेचे नाव : बॅंक ऑफ महाराष्ट्र
 • शाखेचे नाव : युपीएससी शाखा
 • पत्ता : धोलपूर हाऊस, शाहजहान मार्ग, नवी दिल्ली - ११००६९

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fund the PM Care Fund deposit in Maharashtra Bank