Coronavirus : विश्‍वासार्हतेमुळे वृत्तपत्रांनाच वाचकांची पसंती

सकाळ वृत्तसेवा
Monday, 20 April 2020

कोरोना विषाणूचा मुकाबला करताना विश्‍वासार्ह माहिती मिळण्याचा स्त्रोत म्हणून वाचकांची पहिली पसंती वृत्तपत्रांनाच असल्याचे स्पष्ट झाले आहे. लॉकडाउनच्या काळात कोरोनाबाबत नागरिकांना विविध माध्यमांतून माहिती मिळत आहे. या उपलब्ध पर्यायांत वाचकांची सर्वाधिक पसंती वृत्तपत्रांनाच असल्याचे ‘सकाळ माध्यम समूहा’ने घेतलेल्या सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे.

पुणे - कोरोना विषाणूचा मुकाबला करताना विश्‍वासार्ह माहिती मिळण्याचा स्त्रोत म्हणून वाचकांची पहिली पसंती वृत्तपत्रांनाच असल्याचे स्पष्ट झाले आहे. लॉकडाउनच्या काळात कोरोनाबाबत नागरिकांना विविध माध्यमांतून माहिती मिळत आहे. या उपलब्ध पर्यायांत वाचकांची सर्वाधिक पसंती वृत्तपत्रांनाच असल्याचे ‘सकाळ माध्यम समूहा’ने घेतलेल्या सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे.

No photo description available.

लॉकडाउनच्या काळात वाचकांना जाणवणाऱ्या अडचणी, त्यांचा प्राधान्यक्रम जाणून घेण्यासाठी ‘सकाळ’ने ऑनलाइन सर्वेक्षण घेतले. यात सहभागी होण्याचे आवाहन वाचकांना करण्यात आले होते. त्याला राज्याच्या कानाकोपऱ्यांतून मोठा प्रतिसाद लाभला. यातून महाराष्ट्रातील वाचकांचा कल, आवडी निवडी समजण्यास नक्कीच मदत होणार आहे. विविध संकेतस्थळे, दूरचित्रवाणी, सोशल मीडिया यांच्या तुलनेत वृत्तपत्रे अधिक विश्‍वासार्ह असल्याचे मत 7३ टक्के वाचकांनी मांडले आहे. ई पेपरच्या तुलनेत प्रत्यक्ष हातात घेऊन वृत्तपत्र वाचण्याचा अनुभव चांगला असल्याचे 65 टक्के वाचकांनी म्हटले आहे.

बातम्या ऐकण्यासाटी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सध्याच्या संकटाच्या काळात दैनंदिन बातम्या पुरवण्याचे साधन म्हणून अन्य माध्यमांच्या तुलनेत वृत्तपत्रच आघाडीवर राहिले आहे. 42 टक्के वाचकांनी वृत्तपत्रातून आम्हाला बातम्या समजल्याचे म्हटले आहे. तसेच या संकटाच्या काळात वृत्तपत्र वाचण्याचे प्रमाण नेहमीपेक्षा वाढल्याचे 4७ टक्के लोकांना जाणवले आहे. कोरोनाच्या काळात त्यांना जाणवणाऱ्या आर्थिक चिंता तसेच अर्थव्यवस्थेच्या पुनरुज्जीवनावरही वाचकांनी आपली मते स्पष्टपणे मांडली आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Newspapers are the only readers choice because of their reliability