Coronavirus : राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 1700 पार; मृतांचा आकडा...

वृत्तसंस्था
Sunday, 12 April 2020

मुंबई, पुणे परिसरातील कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता राज्यात ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढविण्याची घोषणा करण्यात आली.

मुंबई : कोरोना व्हायरसच्या संसर्गाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 1700 पेक्षा अधिक झाली आहे. राज्यात काल दिवसभरात कोरोनाबाधित 187 नवीन रुग्णांची नोंद झाल्याने रुग्णांचा आकडा 1700 वर गेला आहे. यापैकी 208 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मुंबई, पुणे परिसरातील कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता राज्यात ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढविण्याची घोषणा करण्यात आली. तर महाराष्ट्र राज्याची विभागणी तीन झोनमध्ये करण्यात आली आहे.

१५ अधिक रुग्ण असतील तर रेड झोन

कोरोनाचे १५ पेक्षा अधिक रुग्ण असलेल्या जिल्ह्यांचा समावेश रेड झोनमध्ये करण्यात आला असून, त्यापेक्षा कमी रुग्ण संख्या असलेल्या जिल्ह्यांना ऑरेंज झोनमध्ये ठेवण्यात आले आहे. तर एकही रुग्ण नसलेल्या जिल्ह्याचा समावेश ग्रीन झोनमध्ये करण्यात आला आहे. 

Coronavirus

रेड झोनमध्ये असेल तर...

ज्या जिल्ह्यांना रेड झोन जाहीर करण्यात आले ते सर्व जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन आता सुरुच राहणार असून, तेथील निर्बंध आणखी कठोर केले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर ऑरेंज झोनमधल्या जिल्ह्यांच्या सीमा बंदच राहतील. तिथले निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्यात येईल. वाहतुकीत सवलत देण्यात येईल. याशिवाय ५९ पेक्षा कमी कर्मचारी वर्ग असलेली कार्यालये सुरू करण्याची परवानगी दिली जाण्याची शक्यता आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Number of Coronavirus Patient Increasing in Maharashtra