Coronavirus : सेलिब्रिटींच घरीच क्वारंटाइन

Celebrity
Celebrity

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांना घरात राहण्याची विनंती केली होती. त्यामुळे सर्व कंपन्या, शाळा, महाविद्यालय तसेच चित्रपटांचे चित्रीकरण रद्द करण्यात आले आहेत. अशावेळी अनेक सेलिब्रिटींनी वेळेचा सदुपयोग करत कोणता ना कोणता छंद जोपासत आहेत. 

अश्‍विनी भावे - सध्या मी अमेरिकेत आहे. कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. कॅलिफोर्नियातही कोरोनाचा प्रसार झाला आहे. इथेही सर्वांना घरीच राहायचा आदेश आहे. या वेळेचा सदुपयोग करण्यासाठी मी स्वयंपाक, वाचन आणि बागकामात माझे मन रमवतेय.

माधव देवचके - कोरोना व्हायरस पसरणार नाही, यासाठी योग्य ती खबरदारी घ्या. बऱ्याच दिवसांनंतर आम्ही सर्व घरी एकत्र आहोत. त्यामुळे मी माझ्या आईला स्वयंपाकात मदत करतोय. काही पुस्तके वाचत आहे. तसेच, घरच्यांची मी योग्य ती काळजी घेत आहे.

सोनाली खरे - बाहेरची परिस्थिती फारच गंभीर आहे. त्यामुळे सर्वांनी आपले मानसिक संतुलन चांगले ठेवणे गरजेचे आहे. अचानक सुटी मिळाल्यामुळे खूप दिवसांपासून राहिलेल्या गोष्टी मी करतेय. नवनवीन पदार्थ बनवतेय, मुलीसोबत घरातच बैठे खेळ खेळत आहे.

मिलिंद गुणाजी - चित्रीकरण झाल्यानंतर मी थोडासा आजारी पडलो आहे. त्यामुळे मला सक्तीने विश्रांती घ्यावीच लागत आहे. त्यातच कोरोनामुळे माझे कुटुंबीयही घराबाहेर पडत नाही. जनतेने बंदमध्ये सहभागी होऊन सीरिअसनेस दाखवून दिला. असाच धीर धरल्यास परिस्थिती आटोक्‍यात येईल.

मृण्मयी देशपांडे - सध्याच्या वातावरणामध्ये घराबाहेर पडणे खूपच भयंकर आहे. त्यामुळे सरकारने केलेल्या सूचनांप्रमाणे सर्वांनी अनुकरण करावे. आज जाहीर केलेल्या ‘जनता कर्फ्यू’मध्ये मीही सहभागी झाले. नेटफ्लिक्‍सवर बघायच्या राहिलेल्या सीरिज पाहिल्या.

प्रीतम कागणे - केंद्र सरकारच्या नियमांचे योग्य ते पालन प्रत्येकानेच केले पाहिजे. तुमचा वेळ जात नसेल, तर टिकटॉक व्हिडिओ बनवा. पण, घरातून बाहेर पडू नका. मी सध्या घरात बसून पुस्तक वाचतेय, तसेच घरच्यांसोबत वेळ घालवतेय.

सौरभ गोखले - ‘जनता कर्फ्यू’ आजपुरताच नव्हे, तर ३१ मार्चपर्यंत पाळणे गरजेचे आहे. त्यात आम्ही सोशल डिस्टन्सिंग पाच दिवसांपासून पाळत आहोत. आज मी स्वतः बिर्याणी बनविली. बंदमुळे सर्वांचेच कुटुंबीयही जवळ आले आहे, ही चांगली गोष्ट आहे.

स्पृहा जोशी - कोरोना हा संसर्गजन्य रोग आहे. याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. तसेच, घरातल्यांचीही काळजी घेतली पाहिजे. मी घरात राहून स्वयंपाक करत आहे. नव्या कविता लिहीत आहे. तसेच चित्र काढतेय, योगा करतेय. अशाप्रकारे मी माझे छंद जोपासत आहे.

सावनी रवींद्र - सध्या जगभरात कोरोनाच्या संक्रमणामुळे अतिशय चिंताजनक परिस्थिती उद्‌भवली आहे. त्यामुळे मी सध्याचा वेळ स्वत:ला देतेय. नियमित गायनाचा रियाज करतेय, तर मनोरंजनासाठी टिकटॉक व्हिडिओही पाहतेय. पण, घराबाहेर पडत नाही.

नीलम पांचाळ - या संकटाला  घाबरू नका; पण स्वतःची काळजी घ्या. मी माझ्या कुटुंबासोबत घरीच आहे. घरी राहून मी नवनवीन वेबसीरिज पाहत आहे. पुस्तक वाचत आहे आणि माझ्या मुलीसोबत घरातच वेळ घालवत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com