#Lockdown2.0 : या सेवा, हे उद्योग होणार सुरु

Mantralaya
Mantralaya

लॉकडाउनसंदर्भात महाराष्ट्र सरकारने नवी प्रसिद्ध केली आहे. त्यात किराणा दुकानांवरील वेळेचे निर्बंध हटविण्यात आले असून नागरिकांना गरजेच्या वस्तू आणि सेवा उपलब्ध होतील, या वर भर दिला आहे. या अधिसूचनेतील सर्व बाबी २० एप्रिल २०२०पासून लागू होणार आहेत. कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव असलेल्या भागांत मात्र निर्बंध कायम राहणार आहेत.

अधिसूचनेतील बाबी खालीलप्रमाणे - 
या गोष्टी सुरू राहणार 

  • रुग्णालये, संशोधन केंद्रे, प्रयोगशाळा, औषध दुकाने व वैद्यकीय साहित्य उत्पादन व विक्री केंद्रे. 
  • कृषी व बागायती कामांसाठी लागणारी साहित्य विक्री. कृषी माल खरेदी विक्री केंद्रे, मार्केट यार्ड. 
  • दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचे संकलन, प्रक्रिया, वितरण, विक्री आणि त्यांची वाहतूक
  • पोल्ट्री फार्म, हॅचरीज
  • पशुखाद्य निर्मिती
  • बँक शाखा आणि एटीएम
  • सेबी, विमा कंपन्या, सहकारी पतसंस्था
  • ज्येष्ठ नागरिक, निराधार, महिला, विधवा निवासीगृहे 
  • निवृत्तीवेतन आणि प्रॉव्हिडंट विषयक सेवा 
  • बालके, स्तनदा मातांना पोषण आहाराचा घरपोच
  • मनरेगाची कामे (सोशल डिस्टंसिंग, मास्क अनिवार्य)
  • टंचाई निवारणासाठीची सर्व कामे 
  • पेट्रोल, डिझेल, केरोसीन, सीएनजी, एलपीजी, पीएनजी यांची वाहतूक व विक्री 
  • वीजेची निर्मिती, पारेषण आणि वितरण 
  • टपाल सेवा
  • पाणीपुरवठा, स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापन 
  • दूरध्वनी आणि इंटरनेट सेवा 
  • महामार्गावरील धाबे सुरू करण्यास परवानगी
  • कार्गो वाहतुकीसाठी बंदरे

जीवनावश्यक वस्तूंची पुरवठा साखळी 

  • जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठासाखळीतील सर्व सेवा 
  • किराणा मालाची तसेच जीवनावश्यक वस्तूंची लहान दुकाने, रेशनची दुकाने, दैनंदिन जीवनातील आवश्यक अन्नधान्य, फळे व भाज्यांची विक्री (वेळेचे बंधन नाही)
  • सेवा
  • सर्व प्रसारमाध्यमे, ब्रॉडकास्टिंग, डीटूएच आणि केबल सेवा देणारी इलेक्ट्रॉनिकमाध्यमे 
  • ५० टक्के कर्मचारी संख्येसह आयटी व आयटी सेवा 
  • कमीत-कमी मनुष्यबळासह डेटा सेंटर्स, कॉल सेंटर्स 
  • ई-कॉमर्स कंपन्या, कुरिअर सेवा, खासगी सुरक्षा सेवा 
  • रेस्टॉरंटमधून घरपोच पार्सल डिलिव्हरी, टेक-अवे सेवा
  • फरसाण किंवा तत्सम पदार्थांची आणि मिठाईची दुकाने (जिथे आत बसून खाण्यास परवानगी नाही.) 

शासकीय व खासगी उद्योग

  • ग्रामीण भागातील उद्योग
  • ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव नाही, अशा ठिकाणी उद्योगांना चालना देता येईल
  • कोळसा उद्योग, खाण आणि खनिज उद्योग(सूक्ष्म खनिजांसह)
  • पॅकेजिंग उद्योग 
  • ग्रामीण भागातील विट भट्ट्या 
  • गव्हाचे पीठ, डाळी आणि खाद्य तेलाशी संबधित सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग 
  • रस्ते, जलसिंचनाची कामे, मॉन्सूनपूर्व आत्यावश्‍यक कामांना परवानागी

हे बंदच राहणार

  • आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमान प्रवास, प्रवासी रेल्वेगाड्या, मेट्रो, आंतरराज्य बस सेवा 
  • औद्योगिक आणि व्यावसायिक उपक्रम, आदरातिथ्य सेवा आणि शैक्षणिक, प्रशिक्षण, कोचिंग संस्था 
  • चित्रपटगृहे, मॉल, जिम, बार, पूल, मनोरंजन पार्क, सभागृहे इत्यादी 
  • सर्व सामाजिक, राजकीय, मनोरंजनपर कार्यक्रम, क्रीडांगणे, धार्मिक ठिकाणे 

कामकाजाच्या ठिकाणांसाठीची मार्गदर्शकतत्त्वे 

  • कर्मचाऱ्यांच्या तापमानाच्या तपासणीची व्यवस्था, सॅनिटायझर, सोशल डिस्टंसिंगचे काटेकोर पालन 
  • ६५ वर्षांहून अधिक वय असलेल्या व्यक्तींना आणि पाच वर्षांहून कमी वयाचे मूल असलेल्यांना घरातून काम करण्यास प्रोत्साहन देणे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com