महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या ७४८वर; कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण?

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 6 April 2020

महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा फैलाव कमी होताना दिसत नाही. रोजच्या रोज नवे रुग्ण आढळत असून आतापर्यंत हा आकडा ७४८वर गेला आहे. यात मुंबईतील रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. राज्य सरकार करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शक्य ते प्रयत्न करत आहे. 

मुंबई : महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा फैलाव कमी होताना दिसत नाही. रोजच्या रोज नवे रुग्ण आढळत असून आतापर्यंत हा आकडा ७४८वर गेला आहे. यात मुंबईतील रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. राज्य सरकार करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शक्य ते प्रयत्न करत आहे. 

राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या आतापर्यंत ७४८ झाली आहे. रविवारी, एका दिवसात ११० नवीन रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंत ५६ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले असून एकूण १३ नवीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आता महाराष्ट्रातील एकूण मृत्यूंचा आकडा ४५वर पोहोचला आहे.

महाराष्ट्रात कोठे किती रुग्ण?

 • मुंबई - ४५८
 • पुणे - १००
 • सांगली - २५
 • नागपूर - १७
 • नगर – २१
 • लातूर - ०८
 • मुंबई वगळून इतर पालिका - ८२
 • यवतमाळ- ०४
 • बुलडाणा - ०५
 • सातारा - ०३
 • औरंगाबाद -०७ 
 • उस्मानाबाद -०४
 • कोल्हापूर - ०२
 • गोंदिया - ०१
 • सिंधुदुर्ग - ०१
 • रत्नागिरी - ०२
 • जळगाव- ०२
 • नाशिक - ०१
 • अमरावती - ०१ 
 • हिंगोली - ०१
 • इतर राज्य - ०२

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Total coronavirus Positive Cases In maharashtra Jump To 748