coronavirus: अभिनेत्री अंकिता लोखंडेच्या इमारतीत आढळला कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण, पुर्ण इमारत केली सील

सकाळ वृत्तसेवा
Monday, 6 April 2020

मालाड येथील एका सोसायटीमध्ये एका व्यक्तीची कोविड-१९ टेस्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर आता ती  संपूर्ण इमारत सील केली गेली आहे..या सोसायटीमध्ये अभिनेत्री अंकिता लोखंडे सोबतंच अनेक टीव्ही स्टार राहतात..

मुंबई- मुंबईमध्ये कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे..त्यातंच आता मालाड येथील एका सोसायटीमध्ये एका व्यक्तीची कोविड-१९ टेस्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर आता ती  संपूर्ण इमारत सील केली गेली आहे..या सोसायटीमध्ये अभिनेत्री अंकिता लोखंडे सोबतंच अनेक टीव्ही स्टार राहतात..

coronavirus: शाहरुख खानचा 'हा' जवळचा मित्र आणि निर्माता तणावाखाली, मुलीला झाली कोरोनाची लागण

एका वेबसाईटच्या रिपोर्टनुसार ही व्यक्ती गेल्या महिन्यात स्पेनहून भारतात आली होती..या अपार्टमेंट सोसायटीमध्ये एकुण ५ विंग आहेत..

These Instapics of Aditya-Natasha proves that they are made for ...

इथे अभिनेत्री अंकिता लोखंडे व्यतिरिक्त अभिनेता मिश्कात वर्मा, टेलिव्हिजन कपल नताशा शर्मा आणि आदीत्य रेडीज, अशिता धवन आणि शैलेश गुलबानी देखील राहतात..

Real-life couple Ashita Dhawan and Shailesh Gulabani to play reel ...

या वेबसाईटने त्या व्यक्तीचं नाव न सांगता लिहिलंय, डी-विंगमध्ये राहणारी एक व्यक्ती या महिन्याच्या सुरुवातीला स्पेनवरुन परत आली होती..त्याची एअरपोर्टवर तपासणी केली असता निगेटीव्ह टेस्ट आली होती मात्र त्या व्यक्तीला १५ दिवस होम क्वारंटाईन राहण्याचा सल्ला दिला गेला होता..मात्र १२ व्या दिवशी त्याच्यामध्ये कोरोना व्हायरसचे लक्षण दिसून आले आणि मग त्यानंतर त्याला आणि त्याच्या पत्नीला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं..

त्या व्यक्तिने त्याची टेस्ट पॉझिटीव्ह आल्याची माहिती दिली..आणि त्याच्या पत्नीची टेस्ट निगेटीव्ह असल्याचं सांगितलं..यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीची तपासणी केली गेली..सुदैवाने त्या सगळ्यांची टेस्ट निगेटीव्ह आली..हे सगळं २६ मार्च रोजी घडलं आणि तेव्हापासून ही सोसायटी बंद करण्यात आली आहे..या सोसायटीमध्ये कोणी प्रवेश करु नये आणि सोसायटीमधून कोणी बाहेर जाऊ नये यासाठी आवारात पोलिस तैनात आहेत.. 

भारतात कोरोनाबाधितांची संख्या आता ४ हजारापेक्षा जास्त झाली आहे तर आत्तापर्यंत १०९ लोकांचा मृत्यु झाला आहे..

corona positive found in actress ankita lokhande society whole building sealed  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona positive found in actress ankita lokhande society whole building sealed