coronavirus: सेल्फ आयसोलेशनबद्दल माहिती देणारा 'हा' आहे लघुपट..तुम्हालाही पाहायचा असेल तर मग हे वाचाच

दिपाली राणे-म्हात्रे, प्रतिनिधी
Friday, 10 April 2020

डॉ. झँडवॅन तुलेकेन आणि मानसशास्त्रज्ञ किंबर्ली विल्सन यांनी सादर केलेला महत्त्वाचा लघुपट ‘कोरोनाव्हायरसः हाऊ टू आयसोलेट युअरसेल्फ’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.. हा एक तासाचा लघुपट अत्यंत सरळ, वन स्टेप गाईड असून त्यातून या जागतिक साथीबाबत गरजेची असलेली सर्व माहिती दिली जाते आणि विश्वासार्ह टिप्स व उपयुक्‍त सल्लेही देण्यात आले आहेत. 

मुंबई- कोविड-१९ विरोधातील युद्ध तीव्र होत असताना जगभरातील अब्जावधी लोक याचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी सेल्फ आयसोलेशल म्हणजेत स्वयं-विलगीकरण करत आहेत. त्याचवेळी सोनी बीबीसी अर्थ आपल्या विशेष उपक्रमाचा भाग म्हणून भारतात डॉ. झँडवॅन तुलेकेन आणि मानसशास्त्रज्ञ किंबर्ली विल्सन यांनी सादर केलेला महत्त्वाचा लघुपट ‘कोरोनाव्हायरसः हाऊ टू आयसोलेट युअरसेल्फ’ घेऊन आला आहे.. हा एक तासाचा लघुपट अत्यंत सरळ, वन स्टेप गाईड असून त्यातून या जागतिक साथीबाबत गरजेची असलेली सर्व माहिती दिली जाते आणि यात अत्यंत विश्वासार्ह टिप्स व उपयुक्‍त सल्लेही देण्यात आले आहेत. 

हे ही वाचा: बॉलीवूडच्या 'सिंघम'ची मुंबई पोलिसांसोबत काम करण्याची तयारी

झँडवॅन तुलेकेन हे ब्रिटनमधील जनरल मेडिकल कौन्सिलमधील नोंदणीकृत डॉक्टर आणि ख्यातनाम सादरकर्ते आहेत. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी ते आघाडीच्या तज्ज्ञांना भेट देतात. ते कोरोना विषाणूविरोधातील या लढ्यात सेल्फ आयसोलेशन सर्वाधिक का महत्त्वाचे आहे? ते सांगतात आणि सेल्फ आयसोलेशनबाबत लोकांच्या खऱ्या जगातील आव्हानांची माहिती देतात. हा लघुपट किंबर्ली यांच्यावरही फोकस करतो. ते सेल्फ आयसोलेशन बाबतच्या मानसिक आव्हानांबाबत माहिती देतात, चिंतेचे व्यवस्थापन कसे करायचे? हे सांगतात आणि सेल्फ आयसोलेशन करत असताना प्रत्येकाने ज्या गोष्टींचे पालन केले पाहिजे त्यांची माहितीही देतात. 

कोरोना विषाणू हा अत्यंत गंभीर चिंतेचा विषय आहे आणि त्यातून बाहेर येण्यासाठी खूप काळ जाईल. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती सेल्फ आयसोलेशनद्वारे त्याचा संसर्ग कमी करण्यासाठी हातभार लावू शकते. याशिवाय, खूप मोठ्या प्रमाणावर माहिती उपलब्ध असल्यामुळे लोकांमध्ये गोंधळ आणि विरोधाभास निर्माण होऊ शकतो. परंतु विषाणूप्रमाणेच चुकीची माहितीही संसर्गजन्य असते हे आपण लक्षात घेतले पाहिजे.

Latest Updates on the Coronavirus Disease

त्यामुळे सोनी बीबीसी अर्थकडून या काळातील सर्वांत महत्त्वाचा लघुपट ‘कोरोनाव्हायरसः हाऊ टू आयसोलेट युअरसेल्फ’ सादर केला जात आहे. हा लघुपट तुम्हाला सोनी बीबीसी अर्थ या वाहिनीवर सोमवारी १३ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता पाहता येेणार आहे..एक तासाचा हा लघुपट असणार आहे..

coronavirus how to isolate yourself premiers in india on sony bbc earth


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus how to isolate yourself premiers in india on sony bbc earth