अभिनेता हृतिक रोशनच्या 'या' जवळच्या व्यक्तीच्या घरात आढळला कोरोना पॉझिटीव्ह.. संपूर्ण कुटूंबाची झाली कोरोना टेस्ट

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 15 April 2020

कोरोना व्हायरसच्या या संकटातून कोणाचीही सुटका झाली नाही मग तो सामान्य नागरिक असो किंवा मग सेलिब्रिटी...नुकतंच अभिनेता हृतिक रोशनच्या जवळच्या व्यक्तीच्या घरात एकाला कोरोनाची लागण झाल्याचं समोर येत आहे...

मुंबई- देशभरात कोरोना व्हायरसचं संकट ठाण मांडून बसलं आहे..कोरोना व्हायरस बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतंच चालली आहे...या संकटाचा सामना करण्यासाठी अनेक सेलिब्रिटी वेगवेगळ्या प्रकारे मदत करत आहेत तर काही सेलेब्रिटी जनजागृती करताना दिसत आहेत..कोरोना व्हायरसने सामान्यांपासून ते बड्या उद्योजकांना देखील घरी बसवलं आहे..या संकटातून कोणाचीही सुटका झाली नाही मग तो सामान्य नागरिक असो किंवा मग सेलिब्रिटी...नुकतंच अभिनेता हृतिक रोशनच्या जवळच्या व्यक्तीच्या घरात एकाला कोरोनाची लागण झाल्याचं समोर येत आहे...

हे ही वाचा: शिकारी फेम नेहा खानचा डान्सव्यतिरिक्त आहे हा छंद, बघुन प्रेक्षकही झाले आश्चर्यचकित

अभिनेता हृतिक रोशनची पत्नी सुजैन खानची बहीण आणि ज्वेलरी डिझायनर फराह अली खानच्या घरातील एका स्टाफचा रिझल्ट कोरोना पॉझिटीव्ह आल्याचं कळतंय..ज्यामुळे त्यांच्या संपूर्ण कुटूंबात आता कोरोना संकटाची भिती वाढलीये..याबाबत अधिक माहिती फराह अली खानने तिच्या ट्वीटर अकाऊंटवर दिली आहे..ज्यात तिने घरातील सगळ्या सदस्यांनी कोरोना टेस्ट केली गेल असल्याचं म्हटलंय..

फराहने ट्वीटमध्ये लिहीलंय, 'कोविडशी संबंधित बातम्या या व्हायरसपेक्षा पण जास्त वेगाने पसरत आहेत. माझ्या घरातील आज एक कर्मचारी सदस्य कोरोना बाधित असल्याचं समोर आलं आहे..मी त्याचा इलाज करुन घेत आहे..या गोष्टीमुळे आमच्या घरातील सर्व सदस्यांची कोरोनो टेस्ट केली गेली आहे आणि आम्हाला क्वारंटाईनमध्ये राहण्यास सांगितलं आहे..तुम्ही सगळे सुरक्षित आणि मजबुत रहा..ही वेळ देखील निघून जाईल.' 

Hrithik Roshan Farah Ali Khan Pictures, Photos & Images - Zimbio

फराहच्या या ट्वीटवर अभिनेत्री पूजा बेदीने प्रतिक्रिया देत तिला सकारात्मक आणि सुरक्षित राहण्याचा सल्ला दिलाय..तर अभिनेत्री सौफी चौधरीने यावर प्रतिक्रिया देत म्हटलंय, 'आशा करतो की तु व्यवस्थित असशील.'देशभरात आत्तापर्यंत ११ हजार पेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्णांची संख्या समोर येतेय तर या व्हायरसमुळे ३७७ जणांचा मृत्यु झाल्याचं कळतंय..

hrithik roshans closed one farah khan family faces coronavirus scare as staff member tests positive  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: hrithik roshans closed one farah khan family faces coronavirus scare as staff member tests positive